Rajya Sabha Election : ४ राज्यात १६ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

Rajya Sabha Election : ४ राज्यात १६ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

देशातील ४ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण १६ जागांवर निवडणूक होत आहे. शुक्रवारी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान सुरु होत आहे. यानंतर लगेच संध्याकाळपर्यंत निवडणुकीचे निकाल समोर येतील. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. एका एका मतासाठी राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना नजरकैद ठेवलं आहे. एकूणच परिस्थिती टी-२० सामन्यासारखी झाली आहे. सर्वच राज्यांध्ये आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. (Voting for Rajya Sabha elections on 16 seats in 4 states )

महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आमदारांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. आपल्या आमदारांना या राजकीय पक्षांनी हॉटेलमध्ये ठेवलं होते. तसेच हरियाणातील काँग्रेस आमदारांना छत्तीसगडमध्ये नेण्यात आले होते यानंतर गुरुवारी पुन्हा त्यांना दिल्लीत हलवण्यात आले होते. भाजप-जेजेपीने सर्व आमदारांना चंदीगडच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होते. तर राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सर्व आमदारांना उदयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या देखरेखेखाली त्यांना जयपुरमध्ये आणण्यात आले आहे. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या प्रलोभनाला आमदार बळी पडू नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

राज्यसभा निवडणुकीतील प्रमुख चेहरे

राज्यसभा निवडणुकीमध्ये देशात मुख्य उमेदवार आहेत. यामध्ये पीयूष गोयल, निर्मला सीतारामण, काँग्रेस नेता जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, अजय माकन, संजय राऊत, शिवसेना आणि एनसीपीचे प्रफुल्ल पटेल यांसारख्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राजस्थानचे गणित

राजस्थानमध्ये काँग्रेसकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. बीटीपीने काँग्रेसला धक्का दिला आहे. सुभाष चंद्रा अपक्ष उमेदवारी लढवत असल्यामुळे काँग्रेसचे गणित गडबडले आहे. परंतु काँग्रेस तीन जागांवर विजय मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झटका

मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना म्हणजेच जेलमध्ये असलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. तसेच त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नाही. महाराष्ट्रात ६ जागांवर एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीला दोन आमदारांचे मत कमी पडणार आहे.

हरियाणामध्ये काँग्रेसला फटका

राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक लढवत आहे. एक जागा भाजप आणि दुसरी काँग्रेसकडे जाईल, असे पूर्वी मानले जात होते. मात्र कार्तिकेय शर्मा अपक्ष म्हणून उभे राहिल्याने काँग्रेसचे आणखी एक उमेदवार अजय माकन यांची अडचण झाली आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी ठेवली आहे. पण काँग्रेससमोर मोठी अडचण म्हणजे पक्षाचे आमदार कुलदीप शर्मा हे अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांचे सासरे आहेत.

कर्नाटकात कोण मारणार बाजी

कर्नाटकात काँग्रेस एका तर भाजप दोन जागांवर विजयी होईल असे दिसत आहे. चौथ्या जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचा उमेदवार रिंगणात आहे.


हेही वाचा : सहाव्या जागेचा आज फैसला, राज्यसभेसाठी मविआ-भाजपची प्रतिष्ठा पणाला

First Published on: June 10, 2022 8:12 AM
Exit mobile version