Assembly Election 2022: एन्डेमिक! रॅली रोड शो, प्रचारासाठी निवडणूक आयोगाकडून मर्यादा शिथिल

Assembly Election 2022: एन्डेमिक! रॅली रोड शो, प्रचारासाठी निवडणूक आयोगाकडून मर्यादा शिथिल

निवडणूक आयोगाच्या नेमणुकांमध्ये बदल, अशी असेल आयुक्त ठरवणाऱ्या समितीची रचना

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचा आज(बुधवार) चौथा टप्पा पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रचार रॅली आणि रोड शोवर ५० टक्क्यांच्या मर्यादेत शिथिलता करण्यात आली आहे. आयोग आता SDMA नियमांच्या अधिन राहून आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या पूर्वसमतीने रोड शोला परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती लक्षात घेता निवडणूकांचे प्रचार आणि रोड शोवरील बंदी उठवली आहे. मेळावा घेण्यासाठी जवळपास ५० टक्के वापरातील निर्बंध राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मान्यतेच्या नियंत्रणाखाली शिथिल करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये प्रचारासाठी सुरूवातीला मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. ओमिक्रॉन आणि कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रचार, सभा आणि रॅलींवर निर्बंध लादण्यात आले होते. परंतु देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाच राज्यांतील प्रचारसभा आणि रोड शोवर निवडणूक आयोगाकडून ५० टक्क्यांच्या मर्यादेत शिथिलता करण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या रूग्णांच्या आकड्यात घट झाली असून दोन दिवसांत जवळपास रूग्णांचा आकडा १३ हजारांच्या वर होता. परंतु नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांत कोविड-१९ ची संख्या कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी निवडणूक आयोगाला दिली. त्यामुळे आयोगाने प्रचारावरील निर्बंध तात्काळ शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यातील ५९ जागांवरील मतदानाला सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार कालावधी सोमवारी रात्री संपला आहे. चौथ्या टप्प्यात पीलीभीत, लखीमपुर खीरी, सीतापुर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपुर जिल्ह्यात एकूण ५९ विधानसभा जागांवर आज मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण ६२४ उमेदवार मैदानात उतरले आहेत.


हेही वाचा : UP Election 2022 Live Update: उत्तर प्रदेश निवडणुकाच्या शर्यतीत कुठेही काँग्रेस नाही – भाजप उमेदवार अदिती सिंह


 

First Published on: February 23, 2022 8:58 AM
Exit mobile version