घरAssembly Battle 2022UP Election 2022 Live Update: उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात ५ वाजेपर्यंत ५७.४५%...

UP Election 2022 Live Update: उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात ५ वाजेपर्यंत ५७.४५% टक्के मतदान

Subscribe

चौथ्या टप्प्याच्या समारोपानंतर मतदान अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि VVPAT सील केली.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात ५ वाजेपर्यंत ५७.४५% टक्के मतदान

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात १ वाजेपर्यंत ३७.४५ टक्के मतदान झाले.


सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात २२.६२ टक्के मतदान झाले.


केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये केले मतदान


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी मतदान केले.


उत्तर प्रदेशमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ९.१० टक्के मतदान झाले


भाजप खासदार साक्षी महाराज यांनी उन्नाव येथील गदन खेरा प्राथमिक शाळेत मतदान केले.


बसपा नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी मतदानाचा हक्क बजावला


भाजपच्या रायबरेली सदर जागेवरील उमेदवार अदिती सिंह यांनी रायबरेलीच्या लालपूर चौहान येथील केंद्रावर मतदान केलं. त्या म्हणाल्या की, माझी इच्छा आहे की, मला लोकांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी. या शर्यतीत कुठेही काँग्रेस नाही.


बसपा अध्यक्ष मायावतींनी लखनऊमध्ये मतदान केले.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यातील ५९ जागांवरील मतदानाला सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार कालावधी सोमवारी रात्री संपला आहे. चौथ्या टप्प्यात पीलीभीत, लखीमपुर खीरी, सीतापुर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपुर जिल्ह्यात एकूण ५९ विधानसभा जागांवर आज मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण ६२४ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -