Ram Mandir : रामभक्तीवर भाजपाचा कोणताही कॉपीराइट नाही – Uma Bharti

Ram Mandir : रामभक्तीवर भाजपाचा कोणताही कॉपीराइट नाही – Uma Bharti

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे. राम भक्तीवर आमचा (भाजपा) कोणताही कॉपीराइट नाही. प्रभू राम आणि हनुमान हे काही भाजपाचे नेते नाही. ते आपल्या देशाचा राष्ट्रीय सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी दिली आहे. विरोधकांनी अयोध्येत जाऊन पश्चात्ताप करावा, असा सल्ला उमा भारतींनी राम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यात विरोधकांना दिलेल्या निमंत्रणावर दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत उमा भारतींना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील लोकांना निमंत्रण करण्याल आले? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “निमंत्रण देण्याचा निर्णय राम मंदिर ट्रस्टचा आहे. या सोहळ्याला राजकीय पक्षाचा नाही. रामच्या भक्तीवर आमचा (भाजपा) कोणताही कॉपीराइट नाही. भगवान राम आणि हनुमानजी हे भाजपचे नेते नाहीत. राम आणि हनुमान हे आपल्या देशाचा सन्मान आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणालाही निमंत्रण केले जाऊ शकते.”

हेही वाचा – MLA disqualification result : विरोधकांच्या मनातील ‘शंकेची पाल’ खरी ठरणार की…, तर्कवितर्कांना उधाण

भाजपाने रामभक्त असल्याचा अहंकारातून बाहेर पडावे

उमा भारती म्हणाल्या, मला सर्व राजकीय नेत्यांना सांगू इच्छिते की, राम मंदिराचा सोहळ्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका आणि त्यात भागी व्हा. तुम्हाला मत गमवावे लागेल, अशी भीती मनात बाळगू नका.” उमा भारती म्हणाल्या, केवळ भाजपाच रामाची पूजा करू शकतात. या अहंकारातून भाजपाच्या नेत्यांनी बाहेर पडावे, असे नाही. मी विरोधकांना देखील सांगेन की, तुम्ही अयोध्येत जा. या कार्यक्रमात आपण आनंदाने सहभागी व्हावे, कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा भीती मनात न बाळगता.”

हेही वाचा – नागपूर, पुण्यासह संभीजनगरमध्ये PHD फेलोशिपचा पेपर फुटल्याने विद्यार्थी आक्रमक, परीक्षेवर बहिष्कार

डावे आणि काँग्रेसजनांवर आरोप

उमा भारती यांनीही रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर ‘विषारी वातावरण’ निर्माण केल्याचा आरोप केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी प्रायश्चित्त म्हणून निमंत्रण न देता अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराला भेट द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. बाबरी पाडली त्या दिवसांची आठवण करून देताना, उमा भारती म्हणाल्या की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही खूश ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी पाडावी लागली.

 

First Published on: January 10, 2024 12:55 PM
Exit mobile version