सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होऊ शकतात; केंद्रीय मंत्र्याचा दावा

सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होऊ शकतात; केंद्रीय मंत्र्याचा दावा

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा निरर्थक ठरवत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू शकतात मग सोनिया गांधी देखील भारताच्या पंतप्रधान बनू शकतात, असं रामदास आठवले म्हणाले. शनिवारी ते इंदोर येथे माध्यमांशी बोलत होते.

यूपीएला २००४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होतं. त्यावेळी सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं. सोनिया गांधींना पंतप्रधान करावं, असा प्रस्ताव आपण तेव्हा मांडला होता. तसंच सोनियांचा विदेशी वंशाच्या मुद्दा निरर्थक आहे, असं आपण म्हटल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं. जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी, भारताच्या नागरिक, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या, पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असा सवाल देखील आठवले यांनी यावेळी केला.

पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं

रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान करायला हवं होतं असं देखील वक्तव्य केलं आहे. पवार हे जननेते म्हणून पंतप्रधानपदासाठी पात्र होते आणि काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवं होतं, पण सोनिया गांधींनी तसं केलं नाही. जर पवार २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आजच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं, असं आठवले म्हणाले.

 

First Published on: September 26, 2021 12:53 PM
Exit mobile version