Rana Kapoor Statement : प्रियंका गांधींकडून २ कोटींचे पेंटिंग खरेदी करण्यास भाग पाडले, राणा कपूर यांचा मोठा खुलासा

Rana Kapoor Statement : प्रियंका गांधींकडून २ कोटींचे पेंटिंग खरेदी करण्यास भाग पाडले, राणा कपूर यांचा मोठा खुलासा

येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी ईडीसमोर एक मोठा खुलासा केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यासाठी मला बळजबरी करण्यात आली होती, अशी माहिती फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार देण्यात आली आहे. या पेंटिंगमधून मिळालेली रक्कम गांधी परिवाराने न्यूयॉर्कमधील सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरली होती.

राणा कपूर यांनी ईडीला सांगितले की, त्यांना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले होते की एम एफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी नाते निर्माण करण्यात अडचण येईल, शिवाय त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळणार नाही. राणा कपूर यांचे हे कथित विधान येस बँकेचे सह-संस्थापक, त्यांचे कुटुंब, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHEL)चे प्रवर्तक कपिल, धीरज वाधवान आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राचा भाग आहे.

२ कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगून कपूर यांनी दावा केला की, मिलिंद देवरा यांनी नंतर त्यांना गोपनीयपणे सांगितले की विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबियांनी सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये वापरली. सोनिया गांधींचे जवळचे विश्वासू अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, सोनिया गांधींच्या वैद्यकीय उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला मदत देऊन मी कुटुंबासाठी चांगले काम केले आहे, असे कपूर यांनी ईडीला सांगितले.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, मुरली देवरा यांनी राणा कपूरला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी कधीही संबंध निर्माण करता येणार नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यापासूनही रोखले जाईल. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की, ही सक्तीची विक्री होती. ज्यासाठी मी कधीही तयार नव्हतो, आरोपपत्रात कपूर यांनी कथितपणे प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडून खरेदी केलेल्या पेंटिंगबद्दल म्हटले आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग खरेदी करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. खरं तर, मी या डीलसाठी फारच नाखूष होतो आणि मी त्यांच्या मेसेजकडे दुर्लक्ष करून हा व्यवहार टाळण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, असे कपूर यांनी ईडीला सांगितले.


हेही वाचा : महाराष्ट्रात असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही, जशास तसं उत्तर देऊ – देवेंद्र फडणवीस


 

First Published on: April 24, 2022 2:44 PM
Exit mobile version