घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही, जशास तसं उत्तर देऊ -...

महाराष्ट्रात असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही, जशास तसं उत्तर देऊ – देवेंद्र फडणवीस

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना असा संघर्ष सुरू झाला आहे. आम्ही लढायला तयार आहोत. कालची गोष्ट ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. याचं कारण पोलीस झेड प्रोटेक्टी ऑफिशली कळवून पोलीस स्टेशनला येतात. हे सर्व माहिती असताना देखील पोलीस स्टेशनच्या बाहेर हल्ला होतो. याचाच अर्थ पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन आहे असं दिसतंय किंवा पोलिस इतके नाकाम झाले आहेत की असा हल्ला होणार आहे हे माहित असून ते रोखू शकले नाहीत. पोलीस झेड प्रोटेक्टी असलेल्या किरीट सोमय्यांसोबत अशी हयगय करणं चुकीचं आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहीजे. अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही. जर पोलीस झेड प्रोटेक्टीला सुरक्षित ठेवू शकत नसतील आणि त्यांच्या समोर दगड उचलून मारला जातोय. त्यानंतरही एफआयआर घ्यायलाही त्यांना भिती वाटतेय. अशा प्रकाचे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राज्य पाहिलं नव्हतं. पण आम्ही घाबरत नाही. जशास तसं उत्तर आम्ही देऊ शकतो, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला देत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अशा अवस्थेत महाराष्ट्रात कोण येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात येणाऱ्या जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वत:च्या राज्याचा विकास करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली होती. दरम्यान, महाराष्ट्रात कोणीही यायला का तयार नाही, या गोष्टीचं आत्मचिंतन शरद पवारांनीच करायला पाहिजे. पाच वर्षांनंतर महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरु झाले आहे. राज्यातील दोन मंत्री तुरुंगात आहेत. अशा अवस्थेत महाराष्ट्रात कोण येणार आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत पवारांना प्रतित्युर दिलं.

- Advertisement -

एखाद्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणार असेल तर..

मॉरिशिअसचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक उपसचिव पाठवून देण्यात आला. अशा पाहुण्यांसाठी जी अलिशान गाडी द्यावी लागते, ती गाडीदेखील पाठवण्यात आली नाही. त्यांच्यासाठी साधी गाडी पाठवण्यात आली. जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणार असेल तर कोण कशाला महाराष्ट्रात येईल, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र सरकार एका महिलेला घाबरलं

हनुमान चालीसा म्हणा असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांच्या घरात जाऊन अटक केली जाते. हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही म्हटली जाणार तर कुठं पाकिस्तानात म्हटली जाणार का?, एका महिला प्रतिनिधीला कस्टडीत ठेवलं जातं. कोणताही दोष त्यांच्याविरुद्ध सिद्ध होत नाही. महाराष्ट्र सरकार एका महिलेला इतकं घाबरलं आहे की, लोकं जमा करुन हल्ला करण्याची वेळ आली, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही – अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -