वाढत्या महागाईविरोधात ३१ मार्चपासून महागाईमुक्त भारत अभियान सुरू करणार, रणदीप सिंह सुरजेवाला यांची माहिती

वाढत्या महागाईविरोधात ३१ मार्चपासून महागाईमुक्त भारत अभियान सुरू करणार, रणदीप सिंह सुरजेवाला यांची माहिती

देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान महागाई मुक्त भारत अभियान सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली आहे. सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्त्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे, असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा प्रियंका गांधीही या अभियानात सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या सततच्या लुटमुळे सर्वसामान्यांचे खिसे खाली होत आहेत. पाच दिवस आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून भाजप सरकारवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींनी सुद्धा इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचा बोझा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून गेल्या पाच दिवसांमध्ये चौथ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच २२ मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७.८१ रूपये प्रतिलिटवरून ९८.६१ रूपये आणि डिझेलचा दर ८९.०६ रूपयांवरून ८९.८७ रूपये प्रतिलिटर झाला आहे. २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून दरात प्रतिलिटर ८०-८० पैशांनी तीन वेळा वाढ करण्यात आली आहे.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास पगार, अजितदादांची मोठी घोषणा


 

First Published on: March 26, 2022 6:41 PM
Exit mobile version