‘पायलट भाजपमध्ये जाणार नाही म्हणतात, तर त्यांचा पाहुणचार घेणं त्वरीत थांबवावं’

‘पायलट भाजपमध्ये जाणार नाही म्हणतात, तर त्यांचा पाहुणचार घेणं त्वरीत थांबवावं’

राजस्थानमधील राजकीय नाट्यातील आरोप – प्रत्यारोपांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा नाराज सचिन पायलट यांना काँग्रेस पक्षात परत येण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट यांनी आज मीडियासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब आहे. त्यांनी आपल्या माणसांमध्ये येऊन ही खदखद व्यक्त करायला हवी. आतापर्यंत चर्चेसाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. त्याकरता सचिन पायलट यांना येण्याची विनंतीही केली होती. मात्र त्यांनी एकाही बैठकीला उपस्थिती दर्शवली नाही. दरम्यान, पायलट यांनी आज भाजपमध्ये जाणार नसल्याचा निर्णय सांगितला. असे असेल तर त्यांनी ताबडतोब भाजप नेत्यांशी असलेल्या संपर्क तोडावा. हरयाणा सरकारचा पाहुणाचार घेणे थांबवावे. खट्टर सरकारच्या तावडीतून बाहेर पडावे, असे सुरजेवाल यांनी म्हटले आहे.

सचिन पायलटच्या नाराजीवर सुरजेवाला म्हणाले की, गेल्या १४ – १५ वर्षात अनेकदा मोठ्या पदांवर पायलट यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेस किंवा भाजपमध्ये कोणालाही इतके प्रोत्साहन मिळाले नाही जितके पायलट त्यांना मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे आणि चर्चा करावी. तसेच सचिन पायलट यांना पक्षात ओढण्याचे भाजपचे षडयंत्र फेल ठरले असल्याचा टोलाही यावेळी सुरजेवाला यांनी लगावला.

हेही वाचा –

हौसेला मोल नाही! वधूसाठी खास सोन्याचा मास्क, नेकलेसची वाढली मागणी

First Published on: July 15, 2020 4:33 PM
Exit mobile version