Digital Currency च्या दिशेने वाटचाल; पायलट प्रोजेक्टअंतर्गत होणार लॉचिंग, RBI ने सांगितला पूर्ण प्लॅन

Digital Currency च्या दिशेने वाटचाल; पायलट प्रोजेक्टअंतर्गत होणार लॉचिंग, RBI ने सांगितला पूर्ण प्लॅन

देशात डिजिटल करेंन्सी लॉन्च करण्याची तयारी सुरू झाली आहे. या एपिसोडमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वपूर्ण पावले उचलणार आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CNDC) या वर्षी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत लॉन्च करणार आहे. आरबीआयने शुक्रवारी कॉन्सेप्ट पेपरमध्ये ही माहिती दिली. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, विशेष वापराच्या प्रकरणांसंदर्भात डिजिटल करेन्सीला पायलट प्रोजेक्टअंतर्गत लाँचिंग केले जाईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सेंट्रल बँक डिजीटल करेन्सीवरील कॉन्सेप्ट नोट जारी करण्यात आली आहे. जेणेकरून लोकांमध्ये डिजिटल करेन्सी आणि डिजिटल रुपयाच्या वैशिष्ट्यांबद्दल जागरूकता निर्माण होईल.

डिजिटल करेन्सी महत्त्वाची का आहे?

क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी डिजिटल करेन्सी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आरबीआय देखील या प्रयत्नात सतत गुंतले आहे आणि या संदर्भात अमेरिकन फिनटेक कंपनी एफआयएसशी चर्चा सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँक काही काळ सेंट्रल बँक डिजिटल चलनाचे फायदे आणि तोटे यांचे मूल्यांकन करेल आणि त्या दिशेने काम सुरू आहे. डिजिटल करेन्सी सुरू लाँच करण्यापूर्वी चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) साठी पॉयलट प्रोजेक्ट सुरू करण्यास सांगितले आहे.

डिजिटल करेन्सीमुळे नागरिकांना रोख ठेवण्याची गरज भासणार नाही. हे देखील मोबाईल वॉलेटप्रमाणे काम करेल. विशेष म्हणजे डिजिटल चलन ठेवण्यावरही लोकांना व्याज मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये डिजिटल करेन्सी ठेवू शकता किंवा तुमच्या खात्यात ठेवू शकता.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातही केली होती घोषणा

या वर्षी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षात RBI ने डिजिटल करेन्सी किंवा सेंट्रल बँक डिजिटल करेन्सी जारी करण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी FICCI च्या एका कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाच्या विविध व्यावसायिक वापराच्या शक्यता शोधण्यात गुंतले आहेत. सरकारचा उद्देश डिजिटल करेन्सीद्वारे आर्थिक समावेशाची उद्दिष्टे पूर्ण करणे हाच नाही, तर विविध व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्याचाही आहे.


घाटकोपर येथे भर रस्त्यात दोन “कृत्रिम तलाव”?

First Published on: October 7, 2022 8:34 PM
Exit mobile version