‘सकाळी ९.३० वा. कार्यालयात हजर व्हा’, मोदींनी घेतली मंत्र्यांची शाळा

‘सकाळी ९.३० वा. कार्यालयात हजर व्हा’, मोदींनी घेतली मंत्र्यांची शाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांचा चांगलाच क्लास घेतला. सर्व मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात सकाळी ९.३० वाजताच पोहोचावे असे फर्मानच मोदी यांनी काढले आहे. तसेच अनेक मंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी बसून काम करत असतात, अशा मंत्र्यांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ बंद करण्यास मोदींनी सांगितले आहे. तसेच सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांच्या खात्याशी निगडीत राज्यमंत्र्यांन विश्वासात घ्यावे, असेही सांगितले आहे.

पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतमजूरांना ६ हजारांची पेन्शन सुरु केल्यानंतर कालच्या कॅबिनेटमध्ये
ट्रिपल तलाकच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तर दुसऱ्या बाजुला मंत्र्यांना शिस्तीचे धडेही मोदींनी दिले आहेत. हे धडे देत असताना मोदी म्हणाले की, मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अधिकाऱ्यांच्या वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत होतो. आपण करत असलेल्या कामांचा परिणाम पुढील १०० दिवसांत दिसला पाहीजे. तसेच अधिवेशनाच्या ४० दिवसांत मंत्र्यांनी कुठलेही दौरे करू नयेत, असेही मोदींनी सांगितले आहे.

First Published on: June 13, 2019 10:42 AM
Exit mobile version