महाराष्ट्र व केरळमध्ये पुन्हा कोरोना वाढण्याची ही आहेत कारणे

देशात कोरोनाची दुसरी लाट निय़ंत्रणात येत असतानाच केरळ व महाराष्ट्र या राज्यांमध्ये मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे. त्यातही केरळमध्ये कोरोनारुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारचीही झोप उडाली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केरळ सरकारला दिल्या आहेत. दरम्यान,देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पहील्या व दुसऱ्या लाटेनंतरही सर्वाधिक कोरोनाबधित केरळ आणि नंतर महाराष्ट्रात आढळत आहेत. कारण या राज्यांमधून परदेशात जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

सेरो सर्व्हेक्षणानुसार, मध्य आशिया हे असे एकमेव क्षेत्र आहे जिथे केरळवासीय नागरिक मोठ्या संख्येने नोकरी करतात. तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मध्य आशियात केरळचे नागरिक सर्वाधिक असून सरकारी बरोबरच खासगी सेवेतही केरळवासीय नोकरी करत आहेत. यामुळे हेच नागरिक पहील्या लाटेदरम्यान मोठ्या संख्येने भारतात परतले होते व परतत आहेत.

त्यातही मध्य आशियात डेल्टा वेरियंटने थैमान घातले आहे. अद्याप कोरोनाची तिसरी लाट संपूर्ण थांबली असून चौथी लाट उसळण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान केरळ व महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. याचसंदर्भात दिल्लीतील भगवान महादेव वर्धमान मेडीकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिीसिनचे प्रमुख डॉक्टर जुगल किशोर यांनी आपली मंत मांडली आहेत. त्यानुसार केरळमध्येच देशातील पहीला कोरोना रुग्ण आढळला होता. तो चीनमधील वुहान प्रांतातून आला होता. पण त्यावेळी केरळ आरोग्य यंत्रणेने योग्य त्या उपाययोजना करत कोरोनाची पहीली लाट थोपवली होती.

पण दुसऱ्या लाटेत मात्र केरळ व महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला. यामागे परदेशातून मोठ्या प्रमाणावर भारतात परतणारे नागरिक होते. कारण तिकडे कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच ते भारतात आले होते. त्यातील अनेक जणांना डेल्टाचा संसर्ग झाल्याचे नंतर समोर आले. नुकत्याच झालेल्या सेरो सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे की जे नागरिक कोरोनाच्या पहील्या लाटेपासून बचावले त्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झाला. पण जर हीच परिस्थिती कायम राहीली तर तिसरी लाट निश्चितच येणार. यामुळे जास्तीत जास्त वेगात लसीकरण करणे आवश्यक आहे.लसीकरण झालेल्यांना कोरोनाचा धोका उपत्न होण्याची शक्यताही कमी असते. यामुळे कोरोनापासून नागरिकांचा बचाव करणे शक्य आहे.

 

First Published on: July 30, 2021 4:54 PM
Exit mobile version