मेहरौली, गुरुग्राम जंगलात सापडलेली हाडं श्रद्धाचीच; वडिलांशी जुळला हाडांचा DNA

मेहरौली, गुरुग्राम जंगलात सापडलेली हाडं श्रद्धाचीच; वडिलांशी जुळला हाडांचा DNA

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. श्रद्धाचा वडिलांचा डीएन सापडलेल्या हाडांशी जुळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांना महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात सापडलेली हाडं ही श्रद्धाचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. या जंगलातून गोळा केलेल्या सर्व हाडांचे सॅपल्स सीएफएसएलला पाठवण्यात आले होते. आरोपी आफताबच्या कबुलीनंतर ही हाडं जप्त करण्यात आली होती. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचा रिपोर्टही दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करत ते दिल्लीच्या जंगलात फेकले.

गेल्या आठवड्यात श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी त्यांच्या मुलीची निघृण हत्या करणाऱ्या तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान विकास वालकर यांनी वसई पोलिसांवरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गंभीर आरोप केले आहेत. विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी अनेक खुलासे केले होते.

विकास वालकर म्हणाले की, आफताब पुनावालाविरोधात 2020 मध्ये दिलेल्या त्यांच्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर आज श्रद्धा जिवंत असती. आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी करत त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली न्यायालयाने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली होती. यानंतर त्याला पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले, दरम्यान 26 नोव्हेंबरच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान त्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 13 दिवसांची वाढ करण्यात आली होती.

आरोपी आफताब पूनावाला याला अटक केल्यानंतर या प्रकरणात रोज अनेक खुलासे होत आहेत. आफताब रोज ज्या प्रकारची माहिती देत आहे, त्यातील अधिक माहितीतून तो फसवत असल्याचा संशयही पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलीग्राफ चाचणीची मागणी केली, ज्याला दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली.


मुंबईतील वन अविघ्न इमारतीतील आग नियंत्रणात, कोणतीही जीवितहानी नाही

First Published on: December 15, 2022 1:46 PM
Exit mobile version