Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील वन अविघ्न इमारतीतील आग नियंत्रणात, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील वन अविघ्न इमारतीतील आग नियंत्रणात, कोणतीही जीवितहानी नाही

Subscribe

दक्षिण मुंबईतील करी रोड परिसरातील वन अविघ्न इमारतीत पुन्हा भीषण आगीची घटना घडली होती. इमारतीच्या 35 व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आता घटनास्थळी दाखल आणि शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. या घटनेनंतर तात्काळ सर्व नागरिकांना  तातडीने इमारतीखाली आणले गेले. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच अद्याप आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

आज सकाळी 10.45 वाजत ही आग लागली अशी माहिती अग्निशमन दलाने दिली होती. लेव्हल 1 ची ही आग असल्याचे सांगितले गेले. सलग दुसऱ्यांदा या इमारतीमध्ये आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी याच 60 मजली इमारतीलच्या 19 व्या मजल्यावर भीषण आगीची घटना घडली होती. य भीषण आगीतून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीचा दुर्दैवाने हात सुटला 19 व्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला होता. अरुण तिवारी (३०) असे व्यक्तीचे नाव होते. यामुळे वर्षभरानं पुन्हा आगीची घटना घडल्याने आता आगीचे कारण काय? आणि सतत अशा घटना का घडत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -