कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३ टक्क्यांवर, देशात समूह संसर्ग नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३ टक्क्यांवर, देशात समूह संसर्ग नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३ टक्क्यांवर, देशात समूह संसर्ग नाही - केंद्रीय आरोग्यमंत्री

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थिती देशातील रिकव्हरी रेट ६३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या टप्प्यावरही आपल्याकडे विषाणूचा समूह संसर्ग नाही आहे, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, ‘देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३ टक्के तर मृत्यूदर २.७२ टक्के आहे. सध्या वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता नाही आहे. आम्ही कोरोना चाचणीचा वेग वाढत आहोत कारण जास्तीत जास्त कोरोना केसेस शोधून त्यावर उपचार करता येईल.’ ते पुढे म्हणाले की, ‘रोज जवळपास २.७ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या होत आहेत. इतका मोठा देश असून आपण कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाच्या टप्प्यावर पोहोचलो नाही आहोत.’

आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २६ हजार ५०६ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ४७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख ९३ हजार ८०२वर पोहोचला आहे. यापैकी सध्या २ लाख ७६ हजार ६८५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर ४ लाख ९५ हजार ५१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत २१ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona: राज्यात ४८ तासांत आढळले २२२ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!


 

First Published on: July 10, 2020 6:03 PM
Exit mobile version