स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘बीएसएनएल’ मध्ये मेगाभरती

स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘बीएसएनएल’ मध्ये मेगाभरती

स्वेच्छानिवृत्तीनंतर 'बीएसएनएल' मध्ये मेगाभरती

तोट्यात गेलेल्या ‘बीएसएनएल’ने आर्थिक भार कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली. त्याप्रमाणे राज्यात ३१ जानेवारीला ८ हजार ५४४ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळे याचा परिणाम कामकाजावर झाल्याने अवघ्या २० दिवसांत तातडीची उपाययोजना म्हणून मेगाभरती काढण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात १ हजार १६३ कर्मचाऱ्यांची तातडीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

२९ जिल्ह्यांमध्ये मोठी भरती

स्वेच्छानिवृत्तीचा फटका ‘बीएसएनएल’च्या राज्यभरातील कामाला बसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये आणि गोव्यात तातडीने १ हजार १६३ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाणार आहे. त्यानंतर कामाचा आणि कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन नेमकी किती कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे, या निर्णय घेतला जाईल आणि त्याप्रमाणे भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ‘बीएसएनएल’ची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

७८ हजार ५६९ जणांची स्विकारली स्वेच्छानिवृत्ती

देशात ३१ जानेवारीला ‘बीएसएनएल’च्या १ लाख ५३ हजार कर्मचाऱ्यांपैकी ७८ हजार ५६९ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. महाराष्ट्रातील १३ हजार ६७२ कर्मचाऱ्यांपैकी ८ हजार ५४४ स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने ५ हजार १२८ जण कार्यरत आहेत.

अशी होणार भरती?

First Published on: February 20, 2020 1:46 PM
Exit mobile version