रिलायन्स आणि फेसबुक आणणार Super App, जाणून घ्या खासियत

रिलायन्स आणि फेसबुक आणणार Super App, जाणून घ्या खासियत

रिलायन्स आणि फेसबुक आणणार Super App, जाणून घ्या खासियत

रिलायन्स इंटस्ट्रीज आणि फेसबुक एकत्र येऊन एक अॅप तयार करणार आहेत. हा अॅप चीनच्या वीचॅट या सुपर अॅपसारखा असणार आहे. अनेक प्रकारच्या कामासाठी या अॅपचा वापर करता येणार आहे. यासाठी रियालन्स आणि फेसबुक व्हॉट्सअॅपचे प्लॅटफॉर्म वापरू शकता, याबाबत संबंधित चौघांनी ही माहिती दिली आहे. रियालन्स इंटस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फेसबुकचे मोठा प्रमाणात युझरची संख्या आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, यासाठी एक नवीन कंपनी तयार केली जाऊ शकते. यामध्ये दोन्ही कंपन्या गुंतवणूक करू शकतात.

रिलायन्स आणि फेसबुकच्या या सुपर अॅपवर अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहे. यामध्ये चॅटिंग, रिलायन्स रिटेल स्टोअर्स, जिओद्वारे पेमेंट अॅप, जिओ डॉम कॉमवरून ऑनलाईन शॉपिंग इत्यादी प्रकार या सुपर अॅपमध्ये सुविधा असणार आहे.

चीन वीचॅट सारखा हा सुपर अॅप तयार करणाच्या प्रयत्न दोन्ही कंपनी करत आहे. या अॅपमध्ये डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया, गेमिंग, हॉटेल आणि फ्लाइट बुकिंग सारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. या अॅपमुळे रिलायन्सला आपल्या युझरचा खर्च आणि इतर सवयींबद्दल माहिती मिळले. तसंच रिलायन्स आपल्या विविध सुविधांचा समावेश करेल. याशिवाय फेसबुकचा रीचमुळे दोन्ही कंपन्यांना याचा फायदा होणार आहे.

या नव्या कराराच्या कायदेशीर आणि करविषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी वकील आणि सल्लागार नेमले आहेत. फेसबुक आणि रियालन्स जिओमध्ये गुंतवणूक करणार आहे. यासाठी १० टक्के स्टेक्स खरेदी करणार आहे, अशी प्रकारची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत अजूनही दोन्ही कंपन्यांनी अधिकृत काहीच जाहीर केलं नाही. कोरोनामुळे या नवीन योजनेला विलंब होऊ शकतो.


हेही वाचा – LockDown: पगाराची चिंता करू नका, ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क करा


 

First Published on: April 16, 2020 4:57 PM
Exit mobile version