लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावणाऱ्यांना दिलासा; तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार

लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावणाऱ्यांना दिलासा; तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार

प्रातिनिधीक छायाचित्र

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झाले. दरम्यान, नोकऱ्या गेलेल्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या ५० टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या स्वरुपात दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ४० लाख कामगारांना फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना दिलासा मिळावा यासाठी केंद्राने नियम शिथिल केले आहेत. नोकरी गमावलेल्या कामगारांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या दरम्यान ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना मिळणार आहे. याबाबतचे वृत्त मिंटने दिले आहे.

गुरुवारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. ईएसआयसी ही कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे जी २१,००० रुपयांपर्यंतच्या कर्मचार्‍यांना ईएसआय योजनेंतर्गत विमा प्रदान करते. ईएसआयसीच्या सदस्या अमरजीत कौर म्हणाल्या, “ईएसआयसी विमा संरक्षण असलेल्या योग्य व्यक्तीला त्याचे तीन महिन्यांच्या वेतनाची ५० टक्के रक्कम रोख मदत स्वरुपात देईल.”

कसा होईल फायदा?

ईएसआयसी त्यांच्याकडील कडेवारीनुसार बेरोजगार कामगारांना हा फायदा देईल, परंतु यासाठी कर्मचारी कोणत्याही ईएसआयसी शाखेत जाऊन थेट अर्ज करू शकतात आणि योग्य पडताळणीनंतर हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचतील. यासाठी आधार क्रमांकही घेण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सुमारे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार १.९ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. एकट्या जुलै महिन्यातच ५० लाख लोक बेरोजगार झाले.


हेही वाचा – महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर काहींना एकात्मतेची उचकी लागते


 

First Published on: August 21, 2020 10:26 AM
Exit mobile version