कोल्ह्याला खाण्यास दिली स्फोटकं आणि घेतला जीव, १२ जणांना अटक

कोल्ह्याला खाण्यास दिली स्फोटकं आणि घेतला जीव, १२ जणांना अटक

कोल्ह्याला खाण्यास दिली स्फोटकं आणि घेतला जीव, १२ जणांना अटक

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला फटाखे भरून अननस खाण्यास दिल्याची घटना ताजी असताना सोमवारी माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना तिरूची येथील जीयापुरामजवळ घडली असून स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारण्यात आले. या कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविगाभाकडून अटक करण्यात आले आहे.

तसेच, कोल्ह्याला खाण्यास देण्यात आलेल्या मासांमध्ये देशी बनावटी स्फोटकं भरून दिले होते. त्यानंतर ती स्फोटकं कोल्ह्याच्या तोंडात फुटल्याने कोल्ह्याचा जीव गेला असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. संपुर्ण देशात गर्भवती हत्तीणीच्या अमानुष हत्त्येबद्दल संताप असतानाच तिरूचीमध्ये अशाच प्रकारचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे.

असा घडला प्रकार

तिरूची येथील जीयापुरामजवळ १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना मासांमध्ये स्फोटकं भरून कोल्ह्याला खाण्यास दिली आणि त्याची हत्या केली. या लोकांचा समुह मधाच्या शोधात गावामध्ये जात होती. तेथून परत येताना त्यांना वाटेत हा कोल्हा फिरताना दिसला. त्याची शिकार करण्यासाठी त्यांना असा प्रकार केला. ही स्फोटकं मासांमध्ये दिल्याने त्याच्या तोंडात ती फुटली आणि त्याचा जबडा रक्तबंबाळ झाला, अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच जीयापुरम पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान त्यांना एका पोत्यात जनावराचा मृतदेह सोबत असताना काही लोकं चहास्टॉलवर चहा पिताना दिसली. त्यांचा शोध घेत नरिकुरवारांचा समूह दिसला आणि त्यांच्या संशयास्पद वागणुकीवरून त्यांची चौकशी देखील केली.

या चौकशी दरम्यान स्पष्ट झाले की, त्या कोल्ह्याची शिकार या समुहानेच केली होती. या प्रकरणात १२ लोकांना अटक करण्यात आले असून वन अधिकाऱ्यांवी त्यांच्या ताब्यात असणारे देशी बनावटीची बॉम्ब घेतले असून त्यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.


केरळमध्ये हत्तीणीने चुकून फटाके भरलेलं अननस खाल्लं असावं – पर्यावरण मंत्रालय

First Published on: June 9, 2020 4:40 PM
Exit mobile version