घरदेश-विदेशकेरळमध्ये हत्तीणीने चुकून फटाके भरलेलं अननस खाल्लं असावं - पर्यावरण मंत्रालय

केरळमध्ये हत्तीणीने चुकून फटाके भरलेलं अननस खाल्लं असावं – पर्यावरण मंत्रालय

Subscribe

केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच्या प्राथमिक तपासणीत तिने चुकून फटाके भरलेले फळ शक्यतो खाल्लं असल्याचे आढळले

केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच्या प्राथमिक तपासणीत तिने चुकून फटाके भरलेले फळ शक्यतो खाल्लं असल्याचे आढळले आहे. तसेच अनेकवेळा स्थानिक लोक वन्य डुकरांना त्यांच्या शेतातून दूर ठेवण्यासाठी स्फोटकांनी भरलेली फळे ठेवण्याची बेकायदेशीर कृत्य करतात, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

दरम्यान एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाला दिल्याची अमानुष घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर अनेकांनी हे प्रकरण उचलून धरले होते. तसेच ज्या व्यक्तींनी हे कृत्य केले आहे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अमर प्रसाद रेड्डी यांनी ट्विटद्वारे दोन दिवसांपुर्वी दिली होती.

- Advertisement -

मंत्रालयाने म्हटले की,  ‘प्राथमिक तपासात हत्तीणीने चुकून असे फळ खाल्ल्याची बाब उघड झाली आहे. मंत्रालय केरळ सरकारशी सतत संपर्कात आहे आणि त्यांना दोषींना त्वरित अटक करण्यासाठी सविस्तर सल्ला दिला असून हत्तीणीचा मृत्यू झाल्यामुळे निष्काळजीपणाने वागणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले की, “आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून या बेकायदेशीर आणि अत्यंत अमानुष कृत्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही डब्ल्यूसीसीबीएचक्यू यांना देण्यात आल्या आहेत. ”

तसेच पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सोशल मीडियावरील “अफवांवर” लोकांनी विश्वास ठेवू नये, अशी विनंती केली असल्याचे ट्विट केले आहे.


केरळ : गर्भवती हत्तीणीच्या खून प्रकरणी दोघांना अटक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -