भारताची नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; ट्रम्प हा रिपोर्ट वाचाच

भारताची नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; ट्रम्प हा रिपोर्ट वाचाच

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीचा वातावरण चांगलंच रंगलं असून प्रचाराने जोर धरला आहे. राष्ट्राध्यक्षाच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लकन पार्टीकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. यांच्यात जोरदार डिबेट होत आहेत. या दोघांमधील चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियामधील हवा सर्वांत अशुद्ध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेतील वातावरण आणि पर्यावरणावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका कपरण्यात आली. दरम्यान, आता भारताची हवा घाणेरडी आहे म्हणणाऱ्या ट्रम्प यांना चपराक बसेल असा अहवाल समोर आला आहे.

अमेरिकेत कार्बनचं उत्सर्जन सर्वात कमी होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आकडेवारीनुसार अमेरिकेतील हवेची खरी परिस्थिती काय आहे? त्याचं सत्य समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विभागाने २०१९ मध्ये एमिशन गॅप रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार आधी आणि आताही अमेरिकेत सर्वात जास्त ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या दरडोई उत्सर्जनाचा विचार केल्यास अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. तसंच, एकूण उत्सर्जनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, क्लायमेट Action ट्रॅकरने एक अहवाल जारी केला आहे. यानुसार कोरोनाच्या या संकटात अमेरिकेत विषारी वायूंचे उत्सर्जन हे १० टक्क्यांनी कमी होणार आहे.

 

First Published on: October 27, 2020 6:33 PM
Exit mobile version