Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही, केंद्राने नाकारली परवानगी

Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही, केंद्राने नाकारली परवानगी

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा महाराष्ट्राचा रथ दिसणार नाही, केंद्राने नाकारली परवानगी

देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावरील संचलनात यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात दरवर्षी देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारे चित्ररथ सहभागी होत असतात. प्रत्येक राज्यांच्या चित्ररथांना दरवर्षी ठराविक निकषांच्या आधारे संधी दिली जाते. त्यानुसार महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथ यंदा राजपथावर पाहायला मिळेल अशी अनेकांना आशा होती. परंतु केंद्राने परवानगी नाकारल्याने ही आशा संपली आहे.

यंदा महाराष्ट्रातील जैविविधतेची मानके या विषयावरील चित्ररथ पाहायला मिळणार होता. मात्र महाराष्ट्रातील चित्ररथाबरोबर पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारच्या चित्रपथाला केंद्राने परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारल्याचे केंद्राने म्हटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र केंद्राच्या या निर्णयावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जातेय. केंद्र सरकारने भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांच्या चित्ररथाची परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर इतर पक्षांकडूनही सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी ठरतो विशेष आकर्षणाचे केंद्र

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी आकर्षणाचा विषय असतो. २०१५ पासून दोन वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथांना सर्वोत्तम चित्ररथ म्हणून पहिले पारितोषिक मिळाले आहे. २०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला होता, तर २०१८ मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. या दोन्ही चित्ररथांना प्रथम क्रमांक मिळाला होता.

याशिवाय १९८० मध्येही ‘शिवराज्याभिषेक’ याच संकल्पेनेवर आधारित चित्ररथाने बाजी मारली होती. तर १८८३ साली ‘बैलपोळा’ आणि १९९३ ते १९९५ सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले होते.


Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ दिवशी होणार मतदान


First Published on: January 17, 2022 3:43 PM
Exit mobile version