भेटा, जगातल्या सर्वात सुंदर ‘ट्रक ड्रायव्हरला’…

भेटा, जगातल्या सर्वात सुंदर ‘ट्रक ड्रायव्हरला’…

सौजन्य- इन्स्टाग्राम

जगभरात कुठेही ट्रक, टेम्पो यांसारखी अवजड वाहनं चालवण्याचं काम सहसा पुरुषच करताना दिसतात. त्यातही ट्रक ड्राइव्हर म्हटलं की तरूणांच्या तुलनेत मध्यमवयीन पुरुषच अधिक प्रमाणात आढळतात. मात्र, जपानमधील एक तरुणी चक्क ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करते. Rino Sasaki असं या तरुणीचं नाव असून, तिने आपल्या वडिलांसाठी ट्रक ड्राइव्हिंगचं काम पत्करलं आहे. वयाच्या २१ व्या वर्षी सराईतपणे ट्रक चालवण्याचं काम करणारी रिनो सोशल मीडियावर भलतीच फेमस आहे. रिनोच्या सौंदर्याचे आणि मादकतेचे जगभरात लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या रिनोचे इन्स्टाग्रामवरही अनेक चाहते आहेत. रिनोचे हे फॅन्स तिच्या सौंदर्याची प्रशंसा करताना थकत नाहीत. दरम्यान, ‘इतकी सुंदर तरूणी मॉडेल किंवा अभिनेत्री म्हणून काम करण्याऐवजी ट्रक ड्राइव्हरचं काम कसं करते?’, असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्ही जर रिनोचे फोटो पाहिलेत, तर तुम्हालाही हा प्रश्न नक्की पडेल. मात्र, इतक्या कमी वयात आणि इतकी सुंदर असूनही तिने ट्रक चालवण्याचं काम करण्यामागे एक विशेष कारण आहे.

वडिलांसाठी घेतला हा निर्णय…

रिनो जेव्हा ७ वर्षांची होती तेव्हापासून तिच्या वडिलांना एका आजाराने ग्रासले होते. तरीही आपल्या मुलीच्या संगोपनासाठी ते जमेल तसे कष्ट करत असत. रिनोचे वडीलही व्यावसायाने ट्रक ड्राइव्हर होते. फारसे शिक्षण झालेले नसल्यामुळे आणि पोट भरण्यासाठी म्हणून तिचे वडील ट्रक चालकाचं काम करायचे. रिनोही लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत ट्रकवर जायची. ट्रक चालवण्यासाठी दिवसेंदिवस घराबाहेर असताना हे दोघं बाप-लेकच एकमेकांचा आधार बनायचे. मोठं झाल्यावर रिनोने डान्स टिचर म्हणून पार्ट टाईम जॉब सुरु केला. मात्र, २१ वर्षांची झाल्यावर जेव्हा तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले तेव्हा तिने ट्रक चालवून जास्त पैसे कमावण्याचा आणि वडिलांना सुखी ठेवण्याचा निर्णय घेतला. रिनो आता पूर्णवेळ ट्रक ड्राइव्हरचं काम करते. ‘पैसे कमवण्यासाठी आणि आपल्या वडिलांना सुखी ठेवण्यासाठी मी ट्रक चालवण्याचं काम करते आणि मला त्याची लाज वाटत नाही’, असं रिनो अभिनानाने सांगते.

रिनोचे चाहते ज्याप्रमाणे तिच्या सौंदर्याची भरभरुन प्रशंसा करतात, त्याचप्रमाणे तिच्या या जिद्दीलाही सलाम करतात.

रिनोचे वडील…
First Published on: January 28, 2019 2:53 PM
Exit mobile version