ऋषी आनंद नंबियार ठरला ‘क्लासमेट स्पेल बी’चा राष्ट्रीय स्पेलिंग चॅम्प

ऋषी आनंद नंबियार ठरला ‘क्लासमेट स्पेल बी’चा राष्ट्रीय स्पेलिंग चॅम्प

क्लासमेट स्पेल बी सीझन ११ या रेडिओ मिरचीने सुरू केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या स्पेलिंग स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान यांनी विजेत्यांची नावे घोषित केली आणि त्यांचा सन्मान केला. बेंगळुरुच्या गीअर इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलमधील ऋषी आनंद नंबियार याला नॅशनल चॅम्पियन घोषित करण्यात आले तर बेंगळुरुच्याच दिल्ली पब्लिक स्कूलमधील हर्षवर्धन रे या दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा या स्पर्धेत ३० शहरांमधील १००० शाळांमधील ६ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

भारतातून १६ विद्यार्थ्यांची निवड

ही स्पर्धा वेगवेगळ्या टप्प्यांत घेण्यात आली – ग्राऊंड(प्रत्यक्ष), ऑनलाइन आणि फायनल टेलिव्हाइज्ड टप्पा. प्रत्येक शाळेतील आघाडीचे १५ स्पेलर्स सिटी फायनलमध्ये पोहोचले आणि तिथून पुढे राष्ट्रीय अंतिम फेरीत. संपूर्ण भारतातून फक्त १६ विद्यार्थी टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या नॅशनल फायनल्सपर्यंत पोहोचली. ही अंतिम फेरी ४ मे २०१९ पासून डिस्कव्हरी चॅनल,डिस्कव्हरी किड्स आणि डिस्कव्हरी तामिळ या वाहिन्यांवर प्रसारित केली जाणार आहे. या स्पर्धेला रेडिओ मिरचीचे सीओओ यतिश मेहरिशी, आयटीसी लि.च्या एज्युकेशन अॅण्ड स्टेशनरी प्रोडक्ट बिझनेस (ईएसपीबी)च्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग विभागाचे प्रमुख आर. रवीनारायण यांची विशेष उपस्थिती होती.

अशी होती स्पर्धेची संकल्पना

या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती ‘बी बेटर देन युवरसेल्फ’ म्हणजेच स्वत:च्याच तुलनेत अधिक चांगले बना. मुलांनी एकमेकांसोबत, इतरांसोबत नाही तर कायम स्वत:सोबतच स्पर्धा करावी, दरवेळी स्वत:च्याच कामगिरीहून अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा आणि यातूनच आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे यासाठी प्रोत्साहन देण्याच्या क्लासमेटच्या तत्त्वाशी ही संकल्पना अगदी सुसंगत अशीच आहे.

First Published on: April 3, 2019 9:47 PM
Exit mobile version