इटली पोलिसांनी नियम तोडणाऱ्याला असा आपटला, व्हिडीओ व्हायरल

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात अनेक देश विविध उपाययोजना करत आहेत. खासकरुन लॉकडाऊन करण्यात य़ेत आहेत. चीन, इराणनंतर इटली मध्ये सर्वाधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या करोनावर निय़ंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंध घालण्यात येत आहेत. हे निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. हे स्पष्ट करणारा व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून आपल्या देशातही असेच अनुशासन असणे गरजेचे असल्याचे कपूर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. त्याचे अनेकांनी समर्थन केले आहे.

या व्हिडीओमध्ये इटलीत लॉकडाऊन असतानाही एक तरुण रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसत आहे. एका पोलिसाच्या नजरेस पडताच तरुण पोलिसाला चिडवण्याचा प्रयत्न करतो. पण पुढच्याच क्षणी गल्लीच्या दुसऱ्या रस्त्यावरून पोलिसांची गाडी येते. त्याकडे तरुणाची पाठ असल्याचे बघून एक पोलीस त्याच्या पायावरच लाथ मारतो व तरुणाला आडवा करतो. तरुण खाली आपटताच त्याचे हात बांधले जातात व गाडीत टाकून पोलीस त्याला नेतात. अशीच कडक शिस्त आपल्या देशात असणे गरजेचे झाल्याचे कपूर यांनी म्हटले आहे.

First Published on: March 23, 2020 7:50 PM
Exit mobile version