मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी भारताला दिलं मोठं गिफ्ट, तरुणांना होणार मोठा फायदा

मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी भारताला दिलं मोठं गिफ्ट, तरुणांना होणार मोठा फायदा

इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे या तरूणांना मोठा फायदा होणार आहे.

ब्रिटन सरकारने भारतासाठी ३ हजार व्हिसा जारी करण्याची मोठी घोषणा केली आहे. या व्हिसा ब्रिटनमध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी असणार आहेत. भारत असा पहिला देश ठरणार आहे ज्याला या स्कीमचा फायदा होणार आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्व देशांपैकी ब्रिटनचे भारतासोबत सर्वात मजबूत संबंध असल्याचे ब्रिटिश सरकारने म्हटले आहे. भारतीय गुंतवणुकीमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये सुमारे ९५ हजार लोकांना रोजगार मिळतो. ब्रिटन आणि भारत यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

युके-भारत यंग प्रोफेशनल योजनेचा शुभारंभ होत आहे, असं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे. १८ ते ३० वर्ष वयोगटातील जवळपास तीन हजार प्रशिक्षित भारतीय तरुण ब्रिटनमध्ये जाऊन करिअर करु शकतात, असा या योजनेचा उद्देश आहे.


हेही वाचा : ठाकरे-आंबेडकर एकत्र येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतली राजगृह निवासस्थानी


 

First Published on: November 16, 2022 4:32 PM
Exit mobile version