घरताज्या घडामोडीठाकरे-आंबेडकर एकत्र येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतली राजगृह निवासस्थानी भेट

ठाकरे-आंबेडकर एकत्र येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतली राजगृह निवासस्थानी भेट

Subscribe

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या २० तारखेला एकाच मंचावर येणार आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकत आजच आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या ठिकाणी संग्रहायल असल्यामुळे त्याची व्हीजीट देखील मुख्यमंत्री करणार आहेत. त्यानंतर इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी करणार आहेत. परंतु ठाकरे-आंबेडकर येत्या २० नोव्हेंबरला एकत्र येणार असून आगामी काळात राजकीय समीकरणं बदलणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांनी आपण शिवसेना आणि ठाकरे गटासोबत जायला तयार आहोत अशी वक्तव्यं केली होती. परंतु त्यांना त्यावेळी इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र येत असताना आज मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नवी खेळी करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पत्रकार, समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वडिलांनी साथ सोडली असेल पण.., अमोल कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -