रॉबिन हूड आर्मी करणार दीड लाख नागरिकांचे लसीकरण, टेक जायंट कंपन्यांच्या सहाय्याने ५ लाख लोकांना जेवण

रॉबिन हूड आर्मी करणार दीड लाख नागरिकांचे लसीकरण, टेक जायंट कंपन्यांच्या सहाय्याने ५ लाख लोकांना जेवण

रॉबिन हूड आर्मी (Robin Hood Army)  संस्था नेहमीच गरजवंताच्या मदतीसाठी पाठिशी उभी राहते. गेल्या अनेक दिवसांपासून रॉबिन हूड आर्मी लसीकरणासंदर्भात देखील जनजागृती करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी लसीकरण शिबीरे देखील आयोजित करण्यात रॉबिन हूड आर्मीचा मोठा वाटा आहे. रॉबिड हूड आर्मी संस्थेने आता उबर (Uber) गुगल (Google) आणि व्हॉट्स अँप (What’s App) सारख्या कंपन्यांशी हातमिळवणी केला आहे. यांच्यामार्फत रॉबिड हूड आर्मी देशातील जवळपास दीड लाख वंचित लोकांचे लसीकरण करणार आहे. ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याचा उद्दिष्ट आहे तर देशातील २८ राज्यातील गरीब लोकांना ५ लाख जेवण देणार आहे. मिशन २८ स्टेट्स या अभियानातंर्गत देशातील २८ राज्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी तिसऱ्या लाटेआधी लोकांचे लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशात सध्या लोकांचे लसीकरण आणि भुकेलेल्यांना अन्न देणे ही प्रमुख दोन आव्हाने आहेत. रॉबर्ट हूड आर्मी नो फंड पद्धतीवर चालणारी संस्था आहे. देशातील जायंट कंपन्यांच्या मदतीने मिशन २८ स्टेट्स अभियान भारतातील या समस्या सोडवण्यासाठी करणार आहे.

द रॉबिन हूड आर्मीचे संस्थापक नील घोष यांनी असे म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे देशातील अनेक कुटुंबावर भयावह परिस्थिती ओढावली आहे. सरकार आणि प्रशासन आपल्या परीने चांगले काम करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला यंदा आम्ही #mission28states व्हॉट्स अँप, उबर आणि गुगलच्या सहकार्याने देशातील दिड लाख लोकांचे लसीकरण आणि ५ लाख लोकांना जेवण देणार आहोत. हे उद्दीष्ट आम्हाला ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे.

रॉबिन हुड आर्मीच्या या उपक्रमाविषयी व्हॉट्स अँप इंडियाचे प्रमुखे अभिजित बोस म्हणाले, व्हॉट्स अँपने कोरोना काळात मदतीचा हात देत अनेक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रॉबिन हूड हे एक चांगले माध्यम आहे. आम्ही रॉबिन हूड कंपनीला एक चॅटबॉक्स सोल्यूशन देत आहोत जे देशातील २८ राज्यातील स्वंयसेवकांना मदत करेल. ८९७१९६६१६४ या व्हॉट्स अँप क्रमांकावर मेसेज करुन स्वयंसेवक या उपक्रमाचा भाग होऊ शकतात.

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले आहेत की, #मिशन 28 स्टेट्स मोहिमेला पाठिंबा देत रॉबिन हूड आर्मीसोबत सामील होताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतभर कोविडविरोधातील युद्धात सामील होणे हा आमच्यासाठी सन्मान असेल. उबरच्या माध्यमातून वंचित समुहातील लोकांवर वेळेवर लसीकरण करताना त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची जबाबदारी आमची आहे.

रॉबिन हूड आर्मी बद्दल

रॉबिन हूड आर्मी (RHA) ही एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत हजारो तरुण व्यावसायिक आणि नागरिक आहेत. कोरोना काळात लढण्यासाठी ही संस्था पुढे आली. त्यांनी अनेकांना मदत केली आणि आजही करत आहे. मागील सात वर्षांत RHA ने जागतिक स्तरावर २३६ शहरांमधील ७३ लाखांहून अधिक लोकांना लोकांना अन्न दिले आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०१ पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत

First Published on: August 3, 2021 5:51 PM
Exit mobile version