तामिळनाडूत आयकर विभागाचा छापा; ९४ पाकिटामध्ये आढळले १ कोटी ४८ लाख

तामिळनाडूत आयकर विभागाचा छापा; ९४ पाकिटामध्ये आढळले १ कोटी ४८ लाख

९४ पाकिटामध्ये आढळले १ कोटी ४८ लाख

एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू असतानाच निवडणुकांदरम्यान होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराची प्रकरणंही समोर येऊ लागली आहेत. बुधवारी तमिळनाडू येथे आयकर विभागाने टीटीवी दिनकर पार्टीअम्मा मक्कल मुनेत्र कडगम (एएमएमके) यांच्या कार्यालयावर छापा मारला असून त्यांच्या एका कार्यकर्त्यांच्या पाकीटातून एक कोटी ४८ लाख रुपयाची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तमिळनाडूच्या तेनी लोकसभा मतदारसंघातून हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा निवडणुकांसंदर्भातच हस्तांतरित होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हवेत गोळीबार

आयटी महासंचालक बी मुरली कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीटीवी दिनकर पार्टीअम्मा मक्कल मुनेत्र कडगम (एएमएमके) यांच्या कार्यालयात रोडक असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या कारवाईची अंमलबजावणी केली. या कारवाईदरम्यान आयकर अधिकारी आणि एएमएमके कार्यकरत्यांमध्ये बाचाबाची होऊन एकच गोंधळ उडाला. दरम्यान, त्याठिकाणी असणाऱ्या लोकांनी पैसे उचलून पळ काढण्यास सुरुवात केली. नागरिकांना थांबवणे पोलिसांच्या हाता बाहेर गेल्याने अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

९४ पॅकेटमध्ये ठेवण्यात आले पैसे

छापेमारीच्या वेळी मिळालेली कॅश ही ९४ पॅकेट्समध्ये ठेवल्याचे आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या पॅकेट्सवर वार्ड क्रमांक देखील लिहिण्यात आले होते. तसेच हे सर्व वार्ड अंडीपट्टी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्होटरला ३०० रुपये देणे हा हिशोब देखील लिहिण्यात आला होता.

First Published on: April 17, 2019 8:22 PM
Exit mobile version