घरदेश-विदेश'एमएनएम'चे खासदार तामिळी जनतेचा आवाज बुलंद करणार - कमल हसन

‘एमएनएम’चे खासदार तामिळी जनतेचा आवाज बुलंद करणार – कमल हसन

Subscribe

लोकसभेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरणाऱ्या मक्कळ निधीमैय्याम (एनएनएम) पक्षाचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि देशाच्या संसदेत तामिळी जनतेचा आवाज बुलंद करतील असा विश्वास सुप्रसिद्ध अभिनेते आणि एनएनएम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरणाऱ्या मक्कळ निधीमैय्याम (एनएनएम) पक्षाचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि देशाच्या संसदेत तामिळी जनतेचा आवाज बुलंद करतील असा विश्वास सुप्रसिद्ध अभिनेते आणि एनएनएम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी व्यक्त केला. चेन्नई येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

काय म्हणाले कमल हसन

यावेळी कमल हसन म्हणाले की,”त्यांचा पक्ष तामिळनाडूत विजयी झाल्यास भ्रष्टाचार मुक्त शासन तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देईल. तामिळनाडूला सतत पाण्याची टंचाई सोसावी लागत असलयाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मक्कळ निधी मैयाम प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. मक्कळ निधि मैयाम चे सर्व उमेदवार हे सुशिक्षित आणि अनुभवी असून जनतेचे प्रश्न लोकसभेच्या माध्यमातून नक्की सोडवतील असा विश्वास कमल हसन यांनी व्यक्त केला.”

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसला समर्थन

कमल हसन यांनी २०१७ साली ‘मक्कळ निधि मैयाम’ या पक्षाची स्थापना केली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष ३९ जागा लढवत असून विधानसभेच्या १८ जागांवर सुद्धा आपले उमेदवार उभे केलेले आहेत, मात्र, कमल हसन स्वतः या निवडणुकीपासून दूर आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यामंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन पुद्दुचेरी येथे तृणमूल काँग्रेसला समर्थन सुद्धा जाहीर केले होते.

३९ जगांसाठी मतदान

यावेळी तामिळनाडू राज्यात सत्ताधारी अण्णा द्रमुकने भाजप सोबात आघाडी लेकी असून प्रमुख विरोधी पक्ष द्रविड मुनेत्र कझागम ने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १८ एप्रिलला ३९ जागांवर मतदान होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे माजी मुख्यमंत्री जयललिता तसेच एम. करुणानिधी यांच्या अनुपस्थितीतील ही पहिली निवडणूक असणार आहे. दरम्यात सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून आपले नाव कोणीही राजकीय पक्षांशी जोडू नये असे आवाहन त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -