Covid-19: दिल्लीसह ‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात एन्ट्री करणाऱ्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

Covid-19: दिल्लीसह ‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात एन्ट्री करणाऱ्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

प्रातिनिधीक फोटो

देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी रविवारी दिल्लीसह काही राज्ये संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीचं काही क्षेत्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यापूर्वी ४८ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांच्या आरटी-पीसीआर रिपोर्टचा तपास करण्यात अपयशी ठरल्याबद्दल चार विमान कंपन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, विस्तारा, इंडिगो, स्पाइस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहेत. या प्रकरणी अद्याप या चार एअरलाइन्सकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. राज्यामध्ये रविवारी तब्बल ५०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये सर्वाधिक ८८ जणांचा तर मुंबईमध्ये ५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यामध्ये रविवारी ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधितांची संख्या ३८,३९,३३८ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,७०,३८८ इतकी आहे. रविवारी ४५,६५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर राज्यात आजपर्यंत ३१,०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.


महाराष्ट्राची ऑक्सिजनची चिंता मिटणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

 

First Published on: April 19, 2021 8:19 AM
Exit mobile version