Rupali Patil Thombare: ‘मनसेच्या नेत्यांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते’, रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट

Rupali Patil Thombare: ‘मनसेच्या नेत्यांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते’, रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट

रोहित पवारांचा मनसेला टोला, तर रुपाली पाटलांची खोचक टीका

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी प्रवेशानंतर रुपाली पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाने प्रेरित झाल्यामुळे पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. कदाचित मनसेतील काही लोकांनासुद्धा मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते असा खोचक टोला लगावला आहे. रुपाली पाटील यांनी समाज माध्यमांवर टीका करणाऱ्यांनाही खडेबोल सुनावले आहेत.

राष्ट्रवादी प्रवेशानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी संवाद साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. समाधानी आहे. प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी जो विश्वास दाखवला आहे. त्याच आक्रमकपणे काम करा असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे अधिक आक्रमकपणे काम करणार आहे. खुप चांगले वाटत आहे. कुठेतरी कोणतरी पाठीशी खंबीर उभं राहिले आहे असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

“मनसेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची भेट घेत होते. त्यावेळी अजित पवारांची सतत भेट का घेते. असं विचारले जात होते. परंतु मला सांगायचे आहे की, पालकमंत्री म्हणून मी ज्या ज्या वेळी कामानिमित्त त्यांची भेट घेतली आहे. तेव्हा अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून सर्व कामे कायदेशीररित्या पूर्ण केली आहेत. त्या गोष्टी प्रत्येक वेळी चांगल्या वाटत होत्या. कदाचित मनसेतील काही लोकांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे असेल म्हणून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने काम करत राहील. पुणे शहरात मोठा मेळावा घेऊन अनेक महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल असे रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया विकृत

समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया या विकृत आहेत. त्यांना काहीच कळत नाही. २००चा रीचार्ज मारायचा आणि वाटेल ते बोलायचे त्यांना मी भीक घालत नाही. समाज माध्यमांवर बोलणाऱ्यांनी थोडावेळ कामधंदा करा. राजकारणात सगळे पक्ष बदलत असतात. समाजमाध्यमांवर मानसिक खच्चीकरण करण्यासाठी वक्तव्ये केली जातात परंतु रुपाली पाटील ठोंबरे पाटील कोणत्याही मानसिक खच्चीकरणाला घाबरत नाही.


हेही वाचा : Rupali Patil Thombare: रुपाली पाटलांच्या पक्षप्रवेशावर अजितदादा म्हणाले… आगीतून फुफाट्यात होणार नाही


 

First Published on: December 16, 2021 2:51 PM
Exit mobile version