घरताज्या घडामोडीRupali Patil Thombare: रुपाली पाटलांच्या पक्षप्रवेशावर अजितदादा म्हणाले... आगीतून फुफाट्यात होणार नाही

Rupali Patil Thombare: रुपाली पाटलांच्या पक्षप्रवेशावर अजितदादा म्हणाले… आगीतून फुफाट्यात होणार नाही

Subscribe

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. मनसेला रामराम केल्यानंतर रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांचे आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही. रुपाली पाटील यांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. त्यांच्या कामामुळे पक्षाला फायदाच होईल तसेच रुपाली पाटील यांनी पक्षाकडून मदत करण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाती आणि नात्याचा विचार केला जात नाही तर कामाचा विचार केला जातो असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटी बांधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रुपाली पाटील यांनी पक्षप्रवेश केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांचे अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवारांनी रुपाली पाटील यांच्या कामाविषयी कौतुक केलं आहे.

- Advertisement -

आगीतून फूफाट्यात पडलो असे होणार नाही

रुपाली पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेऊ तुमच्यावर आगीतून उठून फूफाट्यात पडलो अशी वेळ येऊ देणार नाही. नाउमेद होऊ नका तुमच्या रक्तात ते नाही. पण काळजी करु नका असे अजित पवार म्हणाले. भावाच्या नात्याने सगळी मदत केली जाईल. रुपाली चाकणकर पुढे जात आहेत तसेच रुपाली पाटील पुढे जातील असे अजित पवार म्हणाले आहेत.

तुमचे काम राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे ठरेल

धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणले तेव्हा काय होणार अशी चर्चा सुरु होती. त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबबादारी दिली. राष्ट्रवादीत जातीचा, नात्याचा विचार केला जात नाही. राष्ट्रवादीत त्याची प्रतिमा, त्याच्या मागील जनाधार याचा विचार केला जातो. पुणे महानगरपालिकेत तुमच्या सारख्या भगिनींना संधी मिळाली पाहिजे. शहराचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तुमचे काम राष्ट्रवादीला महत्त्वाची ठरेल अशी ग्वाही देतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने सर्वांच्या वतीने राष्ट्रवादीमध्ये रुपाली पाटील यांचे स्वागत करतो. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Rupali Patil Thombare: अखेर रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत! अजितदादांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -