Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनवर हल्ला, कीवसह ३ शहरांवर डागली क्षेपणास्त्रे

Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनवर हल्ला, कीवसह ३ शहरांवर डागली क्षेपणास्त्रे

रशिया-युक्रेन यांच्यात वर्षभरापासून संघर्ष सुरू होतं. परंतु हे युद्ध अद्यापही थांबलेलं नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. आता पुन्हा एकदा रशियाने कीवसह ३ शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यावेळी रशियाने कीव, दक्षिणी क्रिवी रिह आणि ईशान्य खार्किव यांचा समावेश आहे.

रशियाने ऑक्टोबरपासून युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करणे सुरू केले आहे. खार्किवचे महापौर इहोर तेरेकोव्ह यांनी टेलिग्राम या सोशल मीडिया अॅपवर सांगितले की, शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी किरिलो टायमोशेन्को यांनी क्रिवी रिह येथील निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.

लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे. तसेच आपात्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अशी माहिती त्यांनी टेलिग्रामवर दिली. रशियाने सांगितले की, ख्रिसमसच्या मध्यावरही युद्ध सुरूच राहणार आहे. तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले होते की, रशियाने ख्रिसमसपर्यंत युक्रेनमधून आपले सैन्य काढण्यास सुरुवात करावी, जे दोघांमधील शांततेसाठी उचललेले पहिले पाऊल असेल. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे.

अमेरिका युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र देणार

रशियाने बुधवारी देखील माहिती दिली आहे की, रशिया युक्रेनमध्ये असलेली अमेरिकन पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याच्या योजनांना अंतिम रूप देत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र दिले जाईल.


हेही वाचा : Pathan Controversy: शाहरुख खान माज दाखवतोय, त्याने माफी मागावी, नाहीतर–विश्व हिंदू परिषद


 

First Published on: December 16, 2022 9:11 PM
Exit mobile version