घरदेश-विदेशPathan Controversy: शाहरुख खान माज दाखवतोय, त्याने माफी मागावी, नाहीतर--विश्व हिंदू परिषद

Pathan Controversy: शाहरुख खान माज दाखवतोय, त्याने माफी मागावी, नाहीतर–विश्व हिंदू परिषद

Subscribe

जोपर्यंत शाहरुख माफी मागणार नाही तोपर्यंत पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.

बॉलीवुड स्टार शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर कोलकाता येथील फिल्म फेस्टीव्हल मध्ये शाहरुख खानने यावर पहील्यांदाच भाष्य केले. त्यावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला असून शाहरुखला माज आला असून जाहीर माफी मागण्याऐवजी तो भारतातील सोशल मीडिया संकुचित मानसिकतेचा असल्याचे सांगतोय. यामुळे जोपर्यंत शाहरुख माफी मागणार नाही तोपर्यंत पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच शाहरुख- दिपिकाच्या बहुचर्चित पठाण या चित्रपटातलं बेशरम रंग हे गाणे प्रसिद्ध झाले. या गाण्याला अवघ्या काही मिनिटात लाखो लाईक्स तर मिळाले पण दिपिकाच्या बिकीनी लूक आणि शाहरुखच्या लूकवरही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या. अनेकांनी या गाण्यास आणि त्यातील पेहरावाबरोबरच शाहरुख दिपिकाच्या केमिस्ट्रीला पसंती दर्शवली. तर दुसरीकडे दिपिकाच्या बोल्ड बिकीनी लूकवर अनेकांनी टिकेची झोड उठवली.  या गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. भगवा रंग हा हिंदुंच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा रंग असल्याने पठाण चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून बॉलीवूडमध्येही दोन गट पडले असून एकगट दिपिकाचे समर्थन करत आहे तर दुसरा तिच्या भगव्या बिकीनी लूकवर आक्षेप दर्शवत आहे.

याचदरम्यान. कोलकाता येथे फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी झालेल्या शाहरुख खानने  या बिकीनी वादावर आपले मत मांडले. यावेळी शाहरुख म्हणाला की सध्या सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याबदद्ल मी कुठेतरी वाचलय की सोशल मीडियावर प्रसिद्दी मिळते आणि त्याचे व्यावसाय़िक मूल्यही वाढते. तरीही या सगळ्या नकारात्मक वातावरणात मी आणि माझ्या सारखे सकारात्मक लोक जिवंत आहेत. शाहरुखच्या या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी याबद्दल बोलताना म्हटले की या गाण्यात भगव्या रंगाचा बेशरम असा उल्लेख करताना आपत्तीजनक हावभाव करण्यात आले आहेत. हा हिंदू विरोधी मानसिकतेचा कहरच आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -