रशिया बनवणार ३ कोटी कोरोना लसीचे डोस; ‘या’ महिन्यात होणार लाँच!

रशिया बनवणार ३ कोटी कोरोना लसीचे डोस; ‘या’ महिन्यात होणार लाँच!

कोरोना लसीचे प्रातिनिधिक छायाचित्र

परदेशात १ कोटी ७० लाख उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या रशियाने या वर्षात प्रायोगिक कोरोना लसीचे ३ कोटी डोस तयार करण्याची योजना आखली आहे.रशियाने अलीकडेच जाहीर केले की त्यांनी कोरोना विषाणूच्या लसीकरणाच्या मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत रशिया या शर्यतीत पुढे आहे.

जगातील पहिली लस करण्याचा दावा

रशियन शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की जगातील पहिली कोरोना व्हायरस लस ऑगस्टमध्ये लाँच केली जाईल. गॅमेलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्जेंडर गिंट्सबर्ग म्हणाले की, १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत कोरोनाची लस लोकांना देण्यास सुरूवात केली जाईल. मॉस्को टाईम्सच्या वृत्तानुसार, की सप्टेंबरपर्यंत खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रशियाचा दावा आहे की, मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तरासोव म्हणाले की या लसीच्या क्लिनिकल चाचण्या १८ जूनपासून गॅमेलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी येथे सुरू करण्यात आल्या होत्या.

सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा

रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परिक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरी ही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तांमध्ये रशियाने कोरोनावर विकसित केलेल्या लसच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती समोर येत होती. सेचेनोव्ह विद्यापीठानेच तसा दावा केला होता. मात्र त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

गेल्या महिन्यातील १८ तारखेला या लसीच्या फेज वनचे परिक्षण सुरू झाले होते. लस प्रयोगासाठी सैन्य दलातूनच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. रशियाच्या TASS न्यूज एजन्सीच्या १० जुलैच्या वृत्तानुसार, फेज १ च्या क्लिनिकल ट्रायल १५ जुलै रोजी संपणार आहेत.


Fact Check : रशियाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत ठरली यशस्वी
First Published on: July 16, 2020 5:45 PM
Exit mobile version