घरCORONA UPDATEFact Check : रशियाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत ठरली यशस्वी

Fact Check : रशियाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत ठरली यशस्वी

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५० पेक्षा जास्त लसीच्या चाचण्यांच्या विविध स्तरावर परिक्षणे केली जात आहेत. यामध्ये भारतात बनवण्यात आलेल्या दोन लसींच्या लवकरच मानवी चाचण्याही सुरू होणार आहेत. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परिक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरी ही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तांमध्ये रशियाने कोरोनावर विकसित केलेल्या लसच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती समोर येत होती. सेचेनोव्ह विद्यापीठानेच तसा दावा केला होता. मात्र त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

रशियाच्या या लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी ती फेज वनची चाचणी होती. या लसीच्या फेज २ च्या चाचण्या सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. फेज ३ बद्दल काहीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि जर्मनी या देशांमध्ये कोरोनावर फक्त एकच कंपनी नाही, तर दोन ते तीन कंपन्यांकडून लस संशोधन सुरु आहे. रशियामधून मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली ही पहिली लस आहे. रशियन संरक्षण मंत्रालयासोबत मिळून गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने करोना व्हायरस विरोधात ही लस विकसित केली आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यातील १८ तारखेला या लसीच्या फेज वनचे परिक्षण सुरू झाले होते. लस प्रयोगासाठी सैन्य दलातूनच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. रशियाच्या TASS न्यूज एजन्सीच्या १० जुलैच्या वृत्तानुसार, फेज १ च्या क्लिनिकल ट्रायल १५ जुलै रोजी संपणार आहेत.

हेही वाचा –

आपण कोरोनात अडकलोय, तिकडे UN नं वेगळाच इशारा दिलाय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -