Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy यांच्यानंतर PM Modi आता Putin यांच्यासोबत बातचीत करणार

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy यांच्यानंतर PM Modi आता Putin यांच्यासोबत बातचीत करणार

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy यांच्यानंतर PM Modi आता Putin यांच्यासोबत बातचीत करणार

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) आज बारावा दिवस आहे. जागतिक दबाव आणि बऱ्याच निर्बंध लावल्यानंतरही बाराव्या दिवशीही रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरू आहे. सध्या रशिया युक्रेनमधील रहिवाशी भागांवर हल्ला करत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा आज, सोमवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत फोनवर बातचीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेंस्की यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी पुतिन आणि झेलेंस्की यांच्यासोबत बातचीत केली होती. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा २६ फेब्रुवारीला झेलेंस्की यांच्यासोबत बातचीत केली होती. त्यावेळेस झेलेंस्की यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये रशियाविरोधात भारताची साथ मागितली होती. परंतु या युद्धामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रातही रशिया विरोधात झालेल्या मतदानापासून भारत दूर राहिला आहे.

जगभरातील देशांना चिंता

रशिया युक्रेनवर दिवसेंदिवस अधिक हल्ले करत आहे. यामुळे भारतासह जगभरातील देशांमध्ये चिंता पसरली आहे. कारण बऱ्याच देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सतत युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना शेजारील देशात येण्यास सांगत आहे. कारण सध्या भारत युक्रेनच्या शेजारी देशांमधून भारतीयांची सुटका करत आहे. पण यादरम्यान युद्धग्रस्त भागातून सीमेपर्यंत येणे सर्वात कठीण काम झाले आहे. रविवारी सरकारने म्हटले की, २२ फेब्रुवारीपासून आतापर्यंत युक्रेनहून १६ हजार भारतीय विद्यार्थ्यांना शेजारील देशांहून उड्डाण करून मायदेशी सुखरुप आणले आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War : इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याचा गोळीबार, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा


First Published on: March 7, 2022 12:46 PM
Exit mobile version