Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये मशिदीवर रशियाचा हल्ला, लहान बालकांसह अनेकजण होते उपस्थित

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये मशिदीवर रशियाचा हल्ला, लहान बालकांसह अनेकजण होते उपस्थित

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये मशिदीवर रशियाचा हल्ला, लहान बालकांसह अनेकजण होते उपस्थित

रशियन सैनिकांनी मारियुपोल शहरच्या एका मशिदीवर मोठा हल्ल्या केला आहे. ज्यामध्ये ८० हून अधिक लोकं राहत होते, अशी माहिती युक्रेन सरकारने दिली आहे. दरम्यान या हल्ल्यातील जखमी आणि मृत्यूच्या संख्येबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यापूर्वी टर्की स्थित युक्रेनी दूतावासाने माहिती दिली होती की, रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये मारियुपोलमध्ये अडकलेले ८६ टर्की नागरिकांचा गट, ज्यामध्ये ३४ मुलांचा समावेश आहे. यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दूतावासाच्या एका प्रवक्त्याने मारियुपोलच्या महापौरांकडून ही माहिती जारी केली आहे.

ते म्हणाले की, ‘मारियुपोलमध्ये कोणालाही संपर्क साधणे कठीण होत आहे.’ युक्रेनने आरोप केला आहे की, ‘रशिया मारियुपोलमध्ये अडकलेल्या लोकांना शहरातून बाहेर जाऊ देत नाहीये. रशियाने चारी बाजूने शहर बंद केले आहे. ज्यामुळे तिथे हजारोच्या संख्येने लोकं अडकले आहेत.’ दुसऱ्या बाजूला रशियाने आरोप केला आहे की, ‘लोकांच्या सुरक्षेतेमागे युक्रेनचे अपयश आहे.’ युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘मारियुपोलमध्ये सुलतान सुलेमान आणि त्यांची पत्नी रोक्सोलाना (हुर्रम सुलतान) मशिदीला रशियाने निशाना बनवले आहे.’

मंत्रालयाने म्हटले की, ‘मशिदीमध्ये ८०हून अधिक वृद्ध आणि मुलं गोळीबारापासून वाचण्यासाठी लपले होते. यामध्ये टर्कीच्या नागरिकांचा समावेश होते.’

युद्धामुळे कोरोनाचा धोका वाढला 

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १७वा दिवस आहे. या युद्धामुळे आर्थिक नुकसानसोबत जीवितहानीही होत आहे. एवढेच नाही तर आता कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. कारण युद्धादरम्यान युक्रेनमधील मोठ्या प्रमाणात लोकं पलायन करत आहेत. तसेच युरोपसह अनेक देशांमधील लोकं वेगवेगळ्या देशात जात आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कारण हे लोकं ज्या परिस्थितीत पलायन करत आहेत, अशात कोरोना चाचणी करणे शक्य नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना महामारीचा धोका वाढत आहे.


हेही वाचा- Russia-Ukraine War: युक्रेनला जैविक शस्त्रांसाठी अमेरिकेचे फंडिंग, रशियाचा आरोप


 

First Published on: March 12, 2022 5:47 PM
Exit mobile version