घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनला जैविक शस्त्रांसाठी अमेरिकेचे फंडिंग, रशियाचा आरोप

Russia-Ukraine War: युक्रेनला जैविक शस्त्रांसाठी अमेरिकेचे फंडिंग, रशियाचा आरोप

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात अमेरिकेने आता थेट प्रवेश केला आहे. रशियाला घेरण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १२ हजार अमेरिकन सैनिकांची फौज युद्धभूमीवर पाठवली आहे. त्यामुळे येत्या दिवसात युद्ध आणखीन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात रशियाने अमेरिका युक्रेनला जैविक शस्त्रांसाठी आर्थिक मदत करत असल्याचा आरोप केला आहे. रशियाने म्हटले की, ‘युक्रेनमध्ये आपल्या लष्करी ऑपरेशनदरम्यान तिथे जैविक शस्त्रात्रे बनवत असल्याचा ठोस पुरावे मिळाले आहेत आणि याच्यामागे अमेरिकेचा हात आहे.’ रशियाच्या या आरोपाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी एक बैठक बोलावली. या बैठकीमध्ये अमेरिकेने पलटवार केला. अमेरिकेने म्हटले की, ‘रशिया जगभरात खोट्या अफवा पसरवत आहे. राष्ट्रपती पुतिन हे ​असे बेकायदेशीर काम करत आहेत.’

रशियाचा आरोप काय होता?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी म्हटले की, ‘अमेरिका युक्रेनमध्ये युक्रेन सरकारच्या समर्थनार्थ एक गुप्त सैन्य-जैविक कार्यक्रम चालवत आहे.’ रशियन सरकारने एक ट्विटमध्ये म्हटले की, ‘त्यांच्या सैनिकांनी सैन्य-जैविक कार्यक्रमाचे पुरावे गोळा केले आहेत.’

- Advertisement -

चीनची तपासाची मागणी

रशियासोबत असलेल्या चीनने हा आरोप गंभीरतेने घेत चिंता व्यक्त केली आहे. चीनचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत झांग जूनने रशियाच्या आरोपांवर म्हटले आहे की, ‘हा एक गंभीर आरोप आहे आणि यांचा प्रत्येक स्तरावर तपास केला पाहिजे. अमेरिका खरंच असे करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.’

अमेरिकेचा पलटवार

रशियाच्या आरोपावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेचे दूत लिंडा थॉमस-ग्रीनफील्ड पलटवार करत म्हणाले की, ‘अमेरिका कधीही जैविक शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी मदत करणार नाही. अमेरिकेद्वारे समर्थित अशी कोणतीही प्रयोगशाळा नाहीये. रशिया स्वतः युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा वापर करत आहे.’

- Advertisement -

हेही वाचा  – Russia-Ukraine War: उत्तर कोरियापेक्षा रशियावर सर्वाधिक निर्बंध; 70 वर्षांचा तोडला रेकॉर्ड


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -