रशियाच्या कोरोना लसीची मानवी चाचणीही झाली यशस्वी!

रशियाच्या कोरोना लसीची मानवी चाचणीही झाली यशस्वी!

अवघं जग एकीकडे कोरोनाच्या लसीची आतुरतेनं वाट पाहात असतानाच दुसरीकडे रशियामध्ये कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी देखील यशस्वी झाल्याची माहिती मिळतेय. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रशियातल्या सॅशेनोव्ह फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये या लसीवर संशोधन सुरू आहे. संस्थेने नुकतीच क्लिनिकल ट्रायल यशस्वीरीत्या पूर्ण केली असून पहिल्या स्वयंसेवकांचा गट १५ जुलै रोजी तर दुसऱ्या स्वयंसेवकांचा गट २० जुलै रोजी डिस्चार्ज होणार आहे. रशियाच्या गमालेई इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजीकडून तयार करण्यात आलेल्या या लसीची चाचणी १८ जूनला सुरू करण्यात आली होती.

सॅशेनोव्ह विद्यापीठाचे संचालक वादिम तारासोव्ह यांनी यासंदर्भात एएनआय/स्पुटनिकला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ही जगातली पहिली अशी कोरोनाची लस आहे जिची क्लिनिकल ट्रायल यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे या लसीची लवकरच मोठ्या नमुन्यावर (Sample Group) टेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

इन्स्टिट्युट ऑफ पॅरासिटोलॉजीचे संचालक अॅलेक्झांडर ल्युकशेव यांच्यामते, या लसीची सुरक्षितता देखील यादरम्यान तपासण्यात आलेली आहे. आणि मानवी शरीरावर वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं या चाचणीमधून सिद्ध झालं आहे. आता ही लस पुढच्या टप्प्यात कधी जाईल, याची प्रतिक्षा शास्त्रज्ञांना आहे.

First Published on: July 12, 2020 6:30 PM
Exit mobile version