मोदी-जेटलींचं स्टेडियमला नाव, त्यांनी क्रिकेटमध्ये कोणती कामगिरी केली; सेनेचा सवाल

मोदी-जेटलींचं स्टेडियमला नाव, त्यांनी क्रिकेटमध्ये कोणती कामगिरी केली; सेनेचा सवाल

मोदी-जेटलींचं स्टेडियमला नाव, त्यांनी क्रिकेटमध्ये कोणती कामगिरी केली; सेनेचा सवाल

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन वाद पेटला आहे. काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं असताना आता शिवसेनेने देखील मोदी सरकारचा समाचार घेतला आहे. शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत अरुण जेटली यांची नावं स्टेडियमला देण्यात आली आहेत, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? पिंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तेथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत,” असं शिवसनेने म्हटलं आहे.

हा तर राजकीय ‘खेळ’

“इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली . राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले . या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात . लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे , पण देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱया पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही . राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल,” असं सेनेने सामनातील अग्रेलखात म्हटलं आहे.

राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही

“मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. अमित शहा म्हणतात, देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार महानतम खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. खेळ जगताशी जोडलेल्या प्रत्येकाची छाती त्यामुळे गर्वाने फुलली असेल. गृहमंत्री शहा यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी जे सांगितले व कृतीत उतरवले त्याबाबत वाद करण्यात अर्थ नाही. कारण गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसच्या सरकारने, नेहरू, गांधी, राव, मनमोहन, मोरारजी, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांनी जे काही केले ते सर्व धुवून आणि पुसून टाकायचे, असे कुणाचे राष्ट्रीय धोरण किंवा राज्य चालवायची भूमिका असेल, तर कपाळ फोडून उपयोग नाही. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल.”

राजीव गांधींचं नाव, म्हणून हा पुरस्कार नको, असं कुणी म्हटलं नव्हतं!

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९९१-९२ सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघास ब्राँझ पदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे.

 

First Published on: August 9, 2021 8:46 AM
Exit mobile version