शबरीमाला मंदिरात विशेष पूजा; महिला पत्रकारांना मज्जाव

शबरीमाला मंदिरात विशेष पूजा; महिला पत्रकारांना मज्जाव

सबरीमाला मंदिर

केरळचे शबरीमाला मंदिर आज संध्याकाळी विशेष पुजेसाठी उघडण्यात येणार आहे. शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशावरुन गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा दर्शनासाठी मंदिर उघडण्यात येत आहे. यावेळी विशेष पुजा देखील केली जाणार आहे. ही पुजा कोणतिही अजचडण ने येता पूर्ण व्हावी यासाठी खास सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र गेल्या वेळी झालेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी रिपोर्टिंगसाठी महिला पत्रकारांना मंदिरात पाठवून नका, असे आदेश शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांनी मीडियाला दिली आहे.

महिला पत्रकारांना पाठवू नका

शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या हिंदू संघटनांनी मीडियावाल्यांना शबरीमाला मंदिरांचे आजचे रिपोर्टिंग करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवू नका असे आवाहन केले आहे. वीएचपी आणि हिंदू ऐक्यवेदी समेत दक्षिणपंथी संघटनेच्या सबरीमाला कर्म समितीने हे आवाहन केले आहे. गेल्यावेळी महिला पत्रकारांवर हल्ला आणि मीडियाच्या वाहनांची तोडफोडची घटना लक्षात घेता संपादकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, महिला पत्रकारांना रिपोर्टिंगसाठी पाठवले तर परिस्थिती बिघडू शकते.

पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

शबरीमाला येथील अयप्पाचे मंदिर विशेष पुजेसाठी काही तास उघडण्यात येणार आहे. या पुजे दरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसंच गेल्यावेळी ५ दिवसासाठी मंदिर उघडण्यात आले असताना जे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्याचा लक्षात घेता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केरळ सरकारने सांगितले की, २३०० पोलीस मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये २० जणांची कमांडो टीम आणि १०० महिला सहभागी आहेत. ज्या महिला पोलीस निरिक्षक आणि उपनिरिक्षकाचे वय ५० वर्षापुढे आहे अशा ३० महिला पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.

कशी असणार आजची पुजा?

शबरीमाला मंदिर आज संध्याकाळी पाच वाजता विशेष पूजेसाठी उघडण्यात येणार आहे. ‘श्री चितिरा अट्टा तिरुनाल’ ची पुजा आज होणार असून आज रात्री १० वाजता मंदिर बंद होणार आहे. तांत्री कंडारारू राजीवारू आणि मुख्य पुजारी उन्नीकृष्णन नम्बूदिरी मंदिराचे दरवाजे संयुक्त रुपामध्ये खोलणार आहे. त्यानंतर ते गर्भगृहातील दिवे लावणार आहेत. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून तीन महिन्याच्या वार्षिक तीर्थयात्रेच्या दर्शनासाठी मंदिर परत खोलण्यात येणार आहे.

First Published on: November 5, 2018 9:48 AM
Exit mobile version