शबरीमला मंदिरात महिलांना आजपासून प्रवेश

शबरीमला मंदिरात महिलांना आजपासून प्रवेश

सबरीमाला मंदिर

शबरीमला देवस्थानात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर बुधवारी सायंकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महिलांना शबरीमला मंदिरात आजपासून प्रवेश देण्यात येणार आहे. मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिकराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन उद्भवणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या हेतूने शबरीमला मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’ने मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याबाबत चर्चा करण्यास बोर्डाने अनिच्छा दर्शवल्याने पंडालम राजघराण्याचे कुटुंबीय तसेच देवस्थान समितीच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे शेकडो महिला भाविकांनी मंगळवारी शबरीमला मंदिरापासून २० किमी अलीकडे असलेल्या निलक्कलच्या घाट रस्तयावर अक्षरश: नाकाबंदी देखील केली होती. त्यासोबतच या महिला शबरीमला मंदिराकडे निघालेल्या सर्व बस, खासगी वाहने अशा सर्व गाड्यांची तपासणी करीत होत्या. या गाड्यांमध्ये १० ते ५० वयोगटातील मुली आणि महिला असल्यास त्यांना तिथेच उतरवून रोखले जात होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असून कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. तसेच शबरीमलाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. त्यासोबतच महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे.  – पिनरयी विजयन, केरळचे मुख्यमंत्री

वाचा – शबरीमला देवस्थान निर्णयाविरोधात केरळी समाजाची निदर्शने

First Published on: October 17, 2018 11:08 AM
Exit mobile version