१९८४ शीख दंगल : सज्जन कुमारनं काँग्रेस सोडली

१९८४ शीख दंगल :  सज्जन कुमारनं काँग्रेस सोडली

१९८४ साली देशभरात शिखांविरोधात दंगल झाली. त्यानंतर हजारो शिखांची हत्या देखील करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जन कुमारला न्यायालयानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, सज्जन कुमारनं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यानं तसं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलं आहे. या पत्रामध्ये सज्जन कुमारनं काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. शीखविरोधी दंगली प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ३० एप्रिल २०१३ रोजी सज्जन कुमारची निर्दोष मुक्तता केली होती. पण, सीबीआयनं या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. त्यावर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयानं सज्जन कुमार याच्यासह तिघांना जम्नठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ३१ डिसेंबर पूर्वी सज्जन कुमारला शरणागती पत्करावी लागणार आहे. त्यापूर्वी त्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधात दंगली झाल्या होत्या. त्याप्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आलं आहे.

वाचा – Breaking : शीख दंगलप्रकरणी सज्जन कुमारला जन्मठेप

 

First Published on: December 18, 2018 1:39 PM
Exit mobile version