घरदेश-विदेशBreaking : शीख दंगलप्रकरणी सज्जन कुमारला जन्मठेप

Breaking : शीख दंगलप्रकरणी सज्जन कुमारला जन्मठेप

Subscribe

१९८४ सालातील शीख दंगलप्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांनी दोषी ठरवण्यात आले आहेत.

१९८४ सालातील शीख दंगलप्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांनी दोषी ठरवण्यात आले आहेत. आज, सोमवारी दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला. सज्जन कुमार यांच्यावर दंगल भडकवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. सज्जन कुमार यांच्यावर दंगल दडवणं आणि कट रचण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

- Advertisement -

सत्र न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता

दिल्ली हायकोर्टाने सज्जन कुमार यांना ३१ डिसेंबरपूर्वी शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना शहर न सोडण्याचेही आदेश देण्यात आले. सत्र न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सज्जन कुमार यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २९ ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल सुरक्षित ठेवला होता. आज, सोमवारी न्यायालयाने निकाल देत सज्जन कुमार यांना दोषी ठरवले.

तर दोघांना १० वर्षांचा कारावासाची शिक्षा

फाळणीच्या वेळी जशा हत्या झाल्या, तसाच प्रकार ३७ वर्षांनी झाल्याचे कोर्टाने नमूद केले. आरोपींना राजाश्रय मिळाल्याने सुनावणीतून त्यांना सूट मिळाली, असेही खंडपीठ म्हणाले. सज्जन कुमार यांच्यासह कॅप्टन भागमल, माजी नगरसेवक बलवान खोखर यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा ठोठाण्यात आली. दरम्यान किशन खोखर आणि माजी आमदार महेंद्र यादव यांना १० वर्षांचा कारावासाची शिक्षा देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -