LockDown: सेक्स टॉइजच्या विक्रीत ६५ टक्के वाढ, महाराष्ट्र पहिल्या स्थानावर तर मुंबई?

LockDown: सेक्स टॉइजच्या विक्रीत ६५ टक्के वाढ, महाराष्ट्र पहिल्या स्थानावर तर मुंबई?

सेक्स

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात देशामध्ये सेक्स टॉइजच्या विक्रीमध्ये तब्बल ६५ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. भारतीय बाजारात कुठल्या सेक्स प्रोडक्टना मागणी आहे? ग्राहकांचा कल काय आहे? याविषयी ThatsPersonal.com च्या ‘इंडिया अनकवर्ड: इन साइटफुल एनलिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया’ रिपोर्टमध्ये विश्लेषण करण्यात आले असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर

२.२ कोटी व्हिजिटर्स आणि ३ लाख ३५ हजार उत्पादनांची ऑनलाइन झालेली विक्री याच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. तर त्याखालोखाल कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.

मुंबई शहर कोणत्या क्रमांकावर?

राज्यातील शहरांमध्ये मुंबईही देखील पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्या खालोखाल बंगळुरु आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्ली एनसीआरच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात सेक्स प्रोडक्टची २४ टक्के जास्त विक्री झाली आहे. तर सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये पुणे देखील मागे नाही. पहिल्या आठ शहरांमध्ये पुणे शहराचा देखील समावेश आहे.

पुरुष करतात सर्वाधिक सेक्स प्रोडक्टची खरेदी

सर्व राज्यांचे विश्लेषण केले असता उत्तर प्रदेशात पुरुष सर्वाधिक सेक्य प्रोडक्टची खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. तर महिला दुपारी १२ ते ३ यावेळेत प्रोडक्ट खरेदी करतात. तर पुरुष रात्री ९ ते मध्यरात्री पर्यंतच्या वेळेत खरेदी करतात, असे रिपोर्टमधून समोर आले आहे.

महिलांची संख्या अधिक

विशेष बाब म्हणजे विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव आणि वडोदरा या शहरात पुरुषांपेक्षा महिला जास्त खरेदी करतात. तसेच सेक्स टॉइज खरेदी करणाऱ्यांमध्ये २५ ते ३४ वयोगटातील ग्राहकवर्ग जास्त आहे.


हेही वाचा – धक्कादायक! कच्चा मासा खाल्याने त्याच्या संपूर्ण शरीरात झाल्या अळ्या आणि…!


First Published on: July 23, 2020 5:57 PM
Exit mobile version