सलमान खानच्या वडीलांना मोहन भागवातांच्या हस्ते पुरस्कार

सलमान खानच्या वडीलांना मोहन भागवातांच्या हस्ते पुरस्कार

सलमान खानचे वडील सलीम खान

बॉलिवूडचे प्रसिध्द पटकथा लेखक आणि सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांना ७७ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी सलीम खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. सलीम खान यांच्यासोबत बॉलिवूडच्या आणखी दोन जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सलीम खान यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूडची प्रसिध्द डान्सर आणि अभिनेत्री हेलन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना देखील हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या दोघांना देखील मोनहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे.

फिल्म ट्रेड एनालिस्ट तरन आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या समारंभाचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हे सुप्रिसिध्द गायिका लता, मंगेशकर, आशा मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांचे वडील होते. ते एक प्रसिध्द संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय संगीत गायक होते.

First Published on: April 25, 2019 12:13 PM
Exit mobile version