फक्त विरोधकांच्याच घरी पोलीस पोहोचतात आणि सत्ताधाऱ्यांना संरक्षण मिळतं- संजय राऊत

फक्त विरोधकांच्याच घरी पोलीस पोहोचतात आणि सत्ताधाऱ्यांना संरक्षण मिळतं- संजय राऊत

Cops at Rahul Gandhi’s Doorstep: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबाबत लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून खळबळ माजली आहे. त्यानंतर संसदेत वेगवेगळ्या हालचालींना वेग आलाय. त्यानंतर आज राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलीस धडकले. भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील लैंगिक पीडितांबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. यावर आता संजय राऊत पुन्हा एकदा कडाडले आहेत.

संजय राऊत माध्यमांशी बातचीत करत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस पोहोचले. यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ‘दिल्लीमध्ये असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी पोलीस जायला हवेत, सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांनी कारवाया करायला हवेत. पण त्या सगळ्यांना संरक्षण मिळतं. फक्त राजकीय विरोधकांच्याच घरी पोलीस जात आहेत. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या घरी पोलीस घुसवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण काहीही झालं तरी झुकायचं नाही, हे विरोधकांनी ठरवलंय.”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

तसंच राहुल गांधी यांना त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काही महिलांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. तर यावर दिल्ली पोलीसांनी राहुल गांधी यांच्या घरी जाऊन कारवाई करण्याची काय गरज आहे? असा सवाल देखील यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला. देशात असे अनेक ठिकाण आहेत जिथे पोलीसांचं पोहोचणं आवश्यक आहे. पण तिथे पोहोचत नाही. पण राहुल गांधी आणि इतर विरोधकांच्या घरी पोलीस, सीबीआय, ईडी पोहोचते.” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केलीय.

यापुढे बोलताना किरेन रिजेजूवर सुद्धा हल्लाबोल केलाय. केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत केलेलं खळबळजनक विधान हा इशारा नव्हे तर धमकीच असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावर माध्यमांनी सवाल केले असता यावर बोलण्याचं संजय राऊतांनी टाळलं. या प्रश्नावर काहीही बोलता ते निघून गेले.

First Published on: March 19, 2023 2:43 PM
Exit mobile version