Goa Election : आमच्या दबावाने भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट द्यावेच लागेल – संजय राऊत

Goa Election : आमच्या दबावाने भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट द्यावेच लागेल – संजय राऊत

गोव्यात मनोहर पर्रिकर यांचे भाजप पक्ष वाढवण्यात आणि गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. भाजपने पर्रिकर कुटुंबाशी वैर घेतले ते पटत नाही. पण आमच्या सगळ्यांच्या दबावामुळे भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट हे द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. जर भाजप तिकिट देणार नसेल आणि उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असतील, तर त्यांना अपक्ष म्हणून जिंकवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. आमच्या इतर पक्षांच्या दबावामुळेच भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट देण्याचा विचार करावा लागतो आहे. त्यासाठीचा विचारही दिल्लीत सुरू आहे.

भाजपने पर्रिकर कुटुंबाला अतिशय चुकीची वागणूक देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने अपमानित करण्यात आले, ती गोष्ट योग्य नसल्याचे मत संजय राऊत यांनी मांडले. जर भाजप उत्पल पर्रीकर यांना तिकिट देणार नसेल तर कॉंग्रेस, तृणमूल आणि कॉंग्रेसने याठिकाणी उमेदवार देऊ नये. उत्पल पर्रीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असेही ते म्हणाले.

गंगेतील प्रेत भाजपला मतदान करणार का ?

उत्तर प्रदेशात अराजकता माजली आहे. गंगेत प्रेत वाहिलेली लोकांनी पाहिली आहे. उत्तर प्रदेशातील मतदान हे भाजपला मतदान करणार नाही. तरीही भाजप बहुमताच्या आकड्याला दावा करत आहे. गंगेतील वाहून गेलेली प्रेत भाजपला मतदान करणार का ? असा सवाल संजय राऊतांनी केला. अखिलेशने सगळ्यांना घेऊन लढाई करणे गरजेचे आहे. अनेकदा अहंकार बुडवतो असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. लोक अपेक्षेने अखिलेश यादव आणि कॉंग्रेसकडे पाहत आहे. परिवर्तन घडवायचे असेल तर अखिलेश यादव, कॉंग्रेस आणि गैरभाजप पक्षांना एकत्र येऊन लढाव लागणार असल्याचेही ते म्हणाले.

वोटबॅंकचे राजकारण

मोदीजींनी कुंभस्नानानंतर दलितांचे पाय धुतले. भाजपचे लोक दलितांच्या घरी जाऊन जेवताना दिसत आहे. पण भाजपच्या मनातील ही जात कधी जाणार हादेखील सवाल आहे. सगळ राजकारण हे वोटबॅंकेचे राजकारण आहे. तसेच जाती प्रथेवर विभागले गेलेले राजकारण असल्याची टीकाही त्यांनी केली.


 

First Published on: January 17, 2022 10:58 AM
Exit mobile version